Home /News /pune /

पूजा-प्रार्थनेसाठी मातोश्रीवर जायचं का?, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल; मंदिरं उघडण्यासाठी BJP आक्रमक

पूजा-प्रार्थनेसाठी मातोश्रीवर जायचं का?, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल; मंदिरं उघडण्यासाठी BJP आक्रमक

BJP Protest for reopen temple:संपूर्ण राज्यात मंदिरं सुरु करण्यासाठी आज भाजपकडून (BJP)शंखनाद आंदोलन सुरु आहे. पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येत आहे.

पुणे, 30 ऑगस्ट: कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं (Maharashtra State Temple Reopen) बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मंदिरं सुरु करण्यासाठी आज भाजपकडून (BJP)शंखनाद आंदोलन सुरु आहे. पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पाटील राज्य सरकारवर (State Government) जोरदार टीका केली आहे. नियम करूनही आजपासून मंदिरे उघडली नाहीत तर लोकं कुलुप तोडून मंदिरात जातील, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच आजपासून राज्यात मंदिरांची कुलुपे काढून भाजपचे कार्यकर्ते मंदिर प्रवेश करत आहेत, असंही ते त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजच्या आज नियमावली देऊन मंदिरे उघडावीत. केंद्राने सणासुदीला गर्दी करू नका असं म्हटलं असलं तरी गर्दी न करता एका वेळी 10 भाविकांना सोडता येईल असं पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरं उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत. ते मंदिरांचे कुलुपं तोडून मंदिरात घुसतील. मुसलमानांना रोज नमाज अदा करायचा असतो. ख्रिश्चनांना चर्चमध्ये जायचं असतं. शीखांना प्रार्थनेसाठी गुरुद्वारामध्ये जायचं असतं. आता लवकरच जैनांचं पर्युषण पर्व सुरु होईल, धार्मिक स्थळं बंद असतील तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचं का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. तर त्यांनी कसबा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शनही घेतलं. हेही वाचा- पतीच्या अटकेच्या कारवाईवर नीलम राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, मंदिरं पूर्णपणे बंद ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे नियम करुन द्या. एकावेळी दहाच जण आत जातील, ते बाहेर आल्याशिवाय पुढचे दहा आत जाणार नाहीत. तसंच मास्क, सॅनिटायझर असे नियम करा. पण मंदिरं आता बंद ठेवू नका. मंदिरं फक्त श्रद्धेचा प्रश्न नव्हे तर रोजगाराचा स्रोतही आहेत. मंदिराबाहेरच्या दुकानावर अनेक संसार चालतात. त्यांचं काय?, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: BJP, Chandrakant patil

पुढील बातम्या