• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • नारायण राणेंना झालेल्या अटकेच्या कारवाईवर पहिल्यांदाच पत्नी नीलम राणे यांची प्रतिक्रिया

नारायण राणेंना झालेल्या अटकेच्या कारवाईवर पहिल्यांदाच पत्नी नीलम राणे यांची प्रतिक्रिया

Narayan Rane Wife Neelam Rane: आता नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray)यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातल्या राजकारण चांगलंच ढवळून निघालं. नारायण राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जामिनावर सुटका झाली. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले. यावर आता नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शिवसेनेकडून असं कधी केलं जाईलं कधीच वाटलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नीलम राणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयुष्यातील 40 वर्षे माझे पती नारायण राणे यांनी शिवसेना पक्षासाठी दिली. जो याआधी पक्षाचा नेता होता. त्याच्यासोबत शिवसेना पक्ष असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. तसंच नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेना आज जे काही करत आहे त्यावर नेमकं काय बोलावं हे देखील समजत नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. राज्यात कोविन अ‍ॅप हॅक करुन फेक प्रमाणपत्र? महापालिकेची पोलिसात तक्रार मुंबईतल्या आमच्या जुहू येथील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही घरात नव्हतो मात्र माझी नातवंडं, सुना घरात असताना हा प्रकार झाला. त्याचं मला खूप वाईट वाटलं, असं म्हणच नीलम राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी नीलम राणे यांनी तुम्ही दोन्ही मुलांना काय सल्ला देतात असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, शांतपणे आपलं काम केलं पाहिजे. असं मी नेहमी दोघांना सांगत असते. भाजप आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे पुन्हा असं काही होईल असं वाटत नसल्याचं त्या म्हणाल्यात. तसंच ज्यावेळी घरावर चाल करुन माणसं येतात. तेव्हा त्यांना बेस उरलेला नाही असं वाटतं. असं राजकारण याआधीही कधी झालं नाही. या थराला कुणी गेलं नाही, असं नीलम राणे यांनी म्हटलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: