पुणे, 26 सप्टेंबर: पुण्यातील (Pune) भाजपचे (Bjp Mla) आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांची एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल (Viral) झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केली आहे. यानंतर भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन केला होता. त्यावर शिर्के यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असं सांगितलं होतं. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकाऱ्यास घाणेरडया भाषेत शिवीगाळ केली. . महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास 2 मिनिटाचं संभाषण झालं. या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. हेही वाचा- ‘‘केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा’’, संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आज भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील कांबळे यांचं तातडीनं निलंबन करावं आणि सुष्मिता शिर्के यांना महापालिकेमध्ये पुन्हा एकदा त्याच पदावर रुजू करावं अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. दरम्यान उद्या पुणे पोलीस आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून सुनील कांबळे यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे. हेही वाचा- चिंताजनक बातमी! पुन्हा एकदा भायखळा तुरुंगात कोरोनाचा हैदोस आमदार आहोत याचा माज घरी दाखवावा- रुपाली चाकणकर भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी केलेल्या त्या विधानांचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
भाजप आमदार सुनील कांबळे, आपण पालिकेत सत्तेत आहोत, आमदार आहोत याचा माज घरी दाखवावा, पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांवर नाही- रुपाली चाकणकर pic.twitter.com/CcrfECFUlw
— News18Lokmat (@News18lokmat) September 26, 2021
आम्ही सर्व संबधीत महिलेच्या पाठीशी आहोत. तसंच सुनील कांबळे, आपण महापालिकेत सत्तेत असून आमदार आहात, त्यामुळे याचा माज घरी दाखवावा, पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांवर नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.