• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • जनता जमिनीवर आणि पालकमंत्री हेलिकॉप्टरने फिरतायत, विखे पाटलांचा घणाघात

जनता जमिनीवर आणि पालकमंत्री हेलिकॉप्टरने फिरतायत, विखे पाटलांचा घणाघात

राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • Share this:
अहमदनगर, 23 एप्रिल: प्रत्येक राज्यात आपत्ती व्यवस्थापन स्वतंत्र स्थापन करतात आणि ते आपल्या राज्यात सुद्धा आहे. मात्र आज आपल्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन राहिलच नाहीये. रेमडेसिवीर (Remdesivir) आणि ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) हे सरकारचे अपयश आहे. आपल्याला किती रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पाहिजे याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन करावे लागते. राज्याचे मुख्य सचिवांच्या अंतर्गत जे टाक्सफोर्स स्थापन केलं आहे त्यांची जबाबदारी होती. मात्र रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन मिळत नाही. तर आम्हाला केंद्र सरकार देत नाही असं म्हणत आहेत. हे आपलं अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते (Maha Vikas Aghadi leaders) केंद्र सरकारवर टीका करत आहेत असं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटलं आहे. ...तर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा झाला नसता आता वास्तविक कोरोना देशात वाढत आहे यामुळे प्रत्येक राज्य ऑक्सिजनची मागणी करणारच दुर्दैवाने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केली पाहिजे होती ती केली नाही. जिल्हा रुग्णालयांना आर्थिक पुरवठा करुन संस्था ऑक्सिजन प्लँट लावला असता तर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा कमी झाला नसता. हे सरकारचे अपयश आहे. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडलय, कोणता मंत्री जिल्ह्यात तळ ठोकून बसला नाही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री जिल्ह्यात तळ ठोकून बसले पाहिजे होते मात्र ते होत नाहीये असंही त्यांनी म्हटलं. तिन्ही पक्षातील मंत्री वेगवेगळे विधान करतात कोविडमुळे होणारे मृत्यू सरकारच्या निष्काळजीमुळे झालेला हा उद्रेक आणि सामान्य लोकांचे जीव गेले आहे याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे असं सुद्धा विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. आपण आज पाहिले तर तिन्ही पक्षाचे मंत्री तीन वेगळे विधान करतात एक म्हणतो कठोर निर्णय घ्या दुसरा म्हणतो ते योग्य नाही आणि तिसरा पक्षातील मंत्र्यांना काय निर्णय होणार हेच माहीत नसते. एवढी विसंगती या महाबकास आघाडीच्या मंत्रांमध्ये आहे हे फक्त राजकारण करतात, राज्यात सीबीआय चौकशी सुरू आहे सरकारच्या कोणत्या मंत्र्याला अटक होणार हे माहीत नाही. सचिन वाजे शंभर कोटी प्रकरणात कोणते सरकारचे मोठे मासे अडकणार याची माहिती नाही. यामुळे हे सर्व प्रकरण झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत आहे राज्यासाठी महाविकासआघाडी हे शाप आहे अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. वाचा: पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी केल्या या 5 मोठ्या मागण्या जिल्हाधिकारी यांनी मिशन मोडमध्ये आले पाहिजे अहमदनगर जिल्ह्यातील मंत्र्यांना वेळ नाहीये. मात्र प्रशासन यंत्राना मंत्र्यांचे काम करण्यात अर्थ नाही. स्वतः धाडस करून लोकांमध्ये जाऊन ऑक्सिजन, रेमडेसिवीरवर तातडीने काम करण्याची गरज आहे असे विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. आपल्या शेजारी असलेल्या औरंगाबाद जिल्हा मोठ्या प्रमाणात कोरोना प्रभावी होता मात्र तिकडे उत्तम प्रकारे ऑक्‍सिजन आणि रेमडेसिवीरचे नियोजन विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. हे नियोजन नगर जिल्ह्यात का होऊ शकलं नाही? जिल्हाधिकारी यांच्या मागे राजकीय शक्ती खंबीरपणे उभी राहिली पाहिजे होती ती दिसत नाही अशी प्रतिक्रिया आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्याचे मंत्री हेलिकॉप्टरने फिरतात - विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री एकदा आले आणि काळजी करू नका म्हणाले त्यांना गोकुळची निवडणूक अधिक महत्त्वाची आहे त्यांना जिल्ह्याच्या काही घेण देण नाही. तिकडे जिल्ह्याचे जे मंत्री आहेत ते हेलिकॉप्टरने फिरतात हेलिकॉप्टरने आगमन करतात आणि हेलिकॉप्टरनेच जातात. जनता खाली जमिनीवर आहे तुम्ही वरती काय करतात राज्यातील सो कॉल जे नेते आहेत काँग्रेसचे त्यांच्याकडे कोणतेही जिल्ह्याच्या पालकमंत्री पद नाही यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात बसून नियोजन केले पाहिजे लोकांचे जीव जात आहेत अशी टीका नाव न घेता विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.
Published by:Sunil Desale
First published: