परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धावून आला भाजप नेता, पुण्यात करत आहे 'पुण्या'चं काम

परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धावून आला भाजप नेता, पुण्यात करत आहे 'पुण्या'चं काम

मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप जाता यावं यासाठी कोथरुडमधील जवळपास 6000 मजुरांची मोफत वैद्यकीय तपासणी केली आहे.

  • Share this:

पुणे, 7 मे: लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या परराज्यातील मजुरांच्या मदतीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील धावून आले आहेत. मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप जाता यावं यासाठी आता चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील जवळपास 6000 मजुरांची मोफत वैद्यकीय तपासणी केली आहे. कोथरुड पोलीस स्टेशन समोरच्या मंत्रा मंगल कार्यालयात सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत ही तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा.. .कोरोना योद्धांना सॅल्युट! एक वर्षाच्या चिमुरड्याला खेचून आणलं मृत्यूच्या दारातून

कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे परराज्यातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता पकडला आहे. मात्र, वैद्यकीय दाखल्याशिवाय कुणालाही त्यांना घरी पोहोचविण्यात येत नसल्याने अनेक मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा..राज्यात कोरोनामुळे 5 पोलिसांचा मृत्यू तर 531 कर्मचाऱ्यांना लागण

जे परराज्यातील मजूर आपल्या गावी परतू इच्छितात त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि दाखला वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास सहा हजार मजुरांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना दाखला वाटप करण्यात आले आहे.

पुणेकरांसाठी GOOD NEWS

गेल्या दीड महिन्याच्या संघर्षानंतर पुण्यातून आता दिलासादायक चित्र समोर आले आहे. पुण्यात तब्बल दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर कोरोना रूग्ण संख्यावाढीचा आलेख आता खाली आला आहे. एवढंच नाहीतर तर कोरोनावर मात करून बरे होण्याच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून दररोज किमान 50 पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येचं प्रमाणही 86 टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर आलं आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी दिली आहे.

हेही वाचा...लग्नाआधीच नवरीच्या आई-वडिलांचं निधन, नातेवाईक न आल्यानं पोलिसांनी केलं कन्यादान

पुण्यातील कोरोना रूग्ण संख्या आता दोन हजारांच्यावर पोहोचली आहे. दररोज वाढणाऱ्या रूग्णसंख्येत गेल्या तीन दिवसांपासून मोठी घट झाली आहे. चार दिवसांपूर्वी पुण्यात दररोज सरासरी शंभराच्यावर नवे रूग्ण सापडत होते. आता मात्र हे प्रमाण 60 ते 70 पर्यंत खाली आलं आहे.

तसंच पुण्यात रुग्ण आढळल्यापासून ते 6 मेपर्यंत यात कोरोनावर मात करून घरी गेलेल्या रुग्णांची आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार, २८ एप्रिल रोजी 206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर हा आलेख हळूहळू वाढत गेला. आता एका महिन्याच्या कालावधीनंतर ही संख्या आता दुपट्ट झाली आहे. 6 मे रोजी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 587 इतकी नोंद झाली आहे.

First published: May 7, 2020, 12:16 PM IST

ताज्या बातम्या