पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा, आता शहरातच होणार कोरोनाची चाचणी

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा, आता शहरातच होणार कोरोनाची चाचणी

अहवाल निगेटिव्ह येतो की पॉझिटिव्ह याची संबधित व्यक्तीलाही चिंता असायची.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 2 मे : पिंपरी चिंचवडकरांसाठी काहीशी दिलासा देणारी बातमी आहे. कारण यापुढे पिंपरीतील कोरोना संशयितांचे रिपोर्ट पुण्यात न पाठवता त्यांची तपासणी पिंपरीतील भोसरी परिसरात असलेल्या NARI अर्थात नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट मध्येच केली जाणार आहे. NARI ही ICMR चीच शाखा आहे. मात्र इथे आतापर्यंत कोरोनाची चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.

पिंपरी शहरातील कोरोना बाधितांच्या वाढती संख्या बघता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी NARI मध्ये covid-19 चाचणी करण्यासंदर्भात मोठा पाठपुरवा केला आणि अखेर या संस्थेत covid- 19 चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी या संस्थेत पाठविण्यात आलेल्या 8 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यातील NIV संस्थेकडे पाठवण्यात आलेले कोरोना संशयित व्यक्तींचे चाचणी अहवाल येण्यासाठी 22 तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता आणि अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोरोना संशयितांना घरी जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. त्यामुळे अशा व्यक्तींची देखरेख करण्यात अधिक यंत्रणेला कार्यरत राहावं लागायचं तर आपला अहवाल निगेटिव्ह येतो की पॉझिटिव्ह याची संबधित व्यक्तीलाही चिंता असायची.

हेही वाचा - मुलीचा फोटो काढून तयार केला अश्लील टिकटॉक VIDEO, 'आवारा आशिक' पोलिसांच्या अटकेत

आता मात्र असे अहवाल कोरोना चाचणीचे अहवाल लवकरच प्राप्त होतील आणि त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरील मोठा ताण कमी होऊन इतर कोरोना बाधितांवर उपचाराची आणि शहरातील संशयित व्यक्तींच्या चाचण्या घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल. त्याच बरोबर पुण्यातील NIV संस्थेवरील भारही काही प्रमाणात कमी होईल, असं मत महापालिका आयुक्त श्रावम हर्डीकर यांनी व्यक्त केलं आहे

पिंपरी चिंचवड शहरात आत्ता पर्यंत एकूण 123 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पैकी 42 जण कोरोना मुक्त झाले आहेत, तर 5 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित व्यक्तींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकरि डॉ. पवन साळवे यांनी दिली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 2, 2020, 12:42 PM IST

ताज्या बातम्या