मुलीचा फोटो काढून तयार केला अश्लील टिकटॉक VIDEO, 'आवारा आशिक' पोलिसांच्या अटकेत

मुलीचा फोटो काढून तयार केला अश्लील टिकटॉक VIDEO, 'आवारा आशिक' पोलिसांच्या अटकेत

अश्लील टिकटॉक व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या 'आवारा आशिक'ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • Share this:

बीड, 2 मे : नव्या तंत्रज्ञानाचा तुम्ही कसा वापर करता, यावरून त्याचे फायदे-तोटे ठरत असतात. टिकटॉक या माध्यमाद्वारे अनेकजण आपल्यातील सुप्त कलागुण दाखवत रातोरात स्टार होतात. मात्र काहीजण आपल्या विकृतीसाठी अशा माध्यमांचा वापर करतात. याचंच एक उदाहरण बीडमध्ये समोर आलं आहे.

शेतात जाताना अल्पवयीन मुलीचा फोटो काढून अश्लील टिकटॉक व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या 'आवारा आशिक'ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा शिवारात घडला आहे. या प्रकरणी संबधीत मुलीच्या फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या टिकटॉकमध्ये 'मैं हूँ आशिक आवारा' आणि 'केसामध्ये गजरा' अशा प्रकारचे गाणे लावून आरोपीने संबधीत मुलीचा फोटो वापरून अश्लील व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ थेट त्या मुलीकडे पोहोचल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी Tiktokच्या नादात एकाने गमावला जीव

देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 3 मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या या काळात लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळे सर्वच व्यवहार बंद असल्यानं आर्थिक संकटही उभा राहिलं आहे. तर काहींना नैराश्यानेही ग्रासलं आहे. यातच नोएडामध्ये एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. उत्तर प्रदेशातील नोएडात राहणाऱ्या एका तरुणाने गुरुवारी टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नाही या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं.

टिकटॉक व्हिडिओ तयार कऱण्याचं वेड तरुणाईत प्रचंड आहे. याच वेडापायी नोएडात चांद मशिदीजवळ राहणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी तरुणाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणाला खाली उतरवलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्राथमिक चौकशी केली असता त्याच्या टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नव्हते म्हणून आत्महत्या केल्याचं समोर आलं.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 2, 2020, 11:50 AM IST

ताज्या बातम्या