जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 'ठाण्याची गद्दारी, नागपूरची गुलामी'; राहुल कलाटेंविरोधात बॅनर वॉर; पुण्यात राजकारण तापलं!

'ठाण्याची गद्दारी, नागपूरची गुलामी'; राहुल कलाटेंविरोधात बॅनर वॉर; पुण्यात राजकारण तापलं!

'ठाण्याची गद्दारी, नागपूरची गुलामी'; राहुल कलाटेंविरोधात बॅनर वॉर; पुण्यात राजकारण तापलं!

चिंचवड मतदारसंघात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्याविरोधात अप्रत्यक्ष बॅनरबाजी सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 11 फेब्रुवारी : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून, चिंचवड मतदारसंघात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्याविरोधात अप्रत्यक्ष बॅनरबाजी सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.   तिरंगी लढत   चिंचवड मतदारसंघात भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका हा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यात आहे. राहुल कलाटे यांनी आपली उमदेवारी मागे घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आता राहुल कलाटे यांच्याविरोधात अज्ञात व्यक्तीने चिंचवडमध्ये बॅनर लावले असून, नाव न घेता राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. खरा शिवसैनिक नावाने हे बॅनर लावण्यात आले आहेत. हेही वाचा :  अजितदादांना मुख्यमंत्री करणार? शरद पवार आता स्पष्टच बोलले बॅनरवर काय?  अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्याविरोधात चिंचवडमध्ये फ्लेक्सबाजी पहायला मिळत आहे. या बॅनरमधून राहुल कलाटे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ’ एका अपक्षाची गद्दारी खोक्यातून, नागपूरची गुलामी,  ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून- खरा शिवसैनिक ’ अशा अशायाच बॅनर मतदारसंघात दिसून आलं आहे. दरम्यान आता या बॅनर वॉरवरून पुन्हा एकदा चिंचवड मतदारसंघात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात