पुणे 24 डिसेंबर : देशभरात NRC आणि CAAविरोधात तीव्र निदर्शनं सुरू आहे. सरकार या कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी आणि कधीपासून करणार हे खरंतर अजून निश्चितही झालेलं नाही. पण त्याआधीच पुण्यात मनसेनं शहरातील बांग्लादेशी घुसखोर मुस्लिमांना पकडून परत पाठवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केलीय. मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी तसं पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. त्यामुळे मनसेच्या या कृतीतून एकप्रकारे NRCला समर्थनच मिळाल्याचं बघायला मिळतंय. तर याच मुद्यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. मनसेने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पत्र लिहून शहरात असलेल्या घुसखोरांना हाकला नाहीतर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा दिलाय. काय म्हणाले राज ठाकरे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या गोंधळावर काही दिवसांपूर्वीच आपली भूमिका जाहीर केली होती. ‘देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यात अमित शहा यशस्वी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. देशाची लोकसंख्या आधीच 125 कोटी असताना अजून बाहेरच्या लोकांना नागरिकत्व का द्यायचं?’ असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला होता. मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही या दोन नेत्यांना करावं लागतंय मंत्रिपदासाठी लॉबिंग ‘आधार कार्ड वापरून मतदान करू शकतो. मग आधार कार्डवर नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही. पण जे मोर्चे काढत आहेत, तोडफोड सुरू आहे, त्यांना तरी या कायद्याबद्दल नीट माहिती आहे का? जे वर्षानुवर्ष देशात राहात आहेत त्यांना का असुरक्षित वाटावं? भारत हा धर्मशाळा नाही. जे घुसखोर त्यांना हाकललंच पाहिजे,’ अशी आक्रमक भूमिकाही राज ठाकरे यांनी घेतली होती. नोटबंदीसारखाच या कायद्यातही गोंधळ आहे.
अरेरे…दारूच्या पैशांसाठी मुलाने केली जन्मदात्या वडिलांची हत्या
‘नोटबंदीनंतर देशात जे गोंधळाचं वातावरण तयार झालं तसंच आताही होत आहे. कारण या कायद्यातच गोंधळ आहे. राज्यातील मराठी मुसलमान शांत आहेत. त्यांची रोजी रोटी इथेच आहे. सरकार घुसखोर आणि शरणार्थी कसे ओळखणार?’ असा सवाल करत राज ठाकरे यांनी या कायद्यातील तरतुदींवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

)







