चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 30 एप्रिल : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला असून राजकीय पक्षांचेही दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाने या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी अजित पवार यांनी बारसू प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे बारसू वरुन पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अजित पवारांनी टीका केली होती. काय म्हणाले अजित पवार? मी पण बारसूला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, सरकारने हा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे. या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा नेमका किती विरोध हे तपासलं पाहिजे. अनेकदा एनजीओच विरोध करत असतात. बेरोजगारी कमी करायची असेल तर मोठे प्रकल्प आलेच पाहिजे. पण ते होताना पर्यावरणही राखलं गेलं पाहिजे. एन्रॉन प्रकल्पावेळी असाच विरोध झाला होता. पवार साहेबांच्या काळात पुढे विरोध करणाऱ्यांनीच तो प्रकल्प राबवल्याचं ही आपण सर्वांनी पाहिलं. वाचा - थोरातांनी ताकद लावूनही राधाकृष्ण विखेंनी मारलं मैदान; राहता एक हाती राखलं सत्ता कोणाचीही असो आपण त्यात सकारात्मक गोष्टीने बघायला हवं. या प्रकरणात शरद पवार मुख्यमंत्री यांच्याशी बोलले आहेत. मी उपमुख्यमंत्री यांना विचारणार आहे की स्थानिकांचे मत काय आहे. राज्यात बेरोजगारी आहे, ती दूर करण्यासाठी राज्यात मोठे प्रकल्प आणले पाहिजे. हे सगळं करत असताना पर्यावरणाचा रास होणार नाही हे बघायला हवं. कोकणात फिरायला लोक जातात, राहायला जातात त्यांना त्रास होणार नाही हे बघायला हवं. अशा प्रकारचे प्रकल्प जगात कुठे आहेत हे बघायला हवं की तिथे लोकांना कुठे आजार आले आहे का? या गोष्टी पाहता येतात. उदय सामंत यांनी चर्चा केली, त्यातून बऱ्यापैकी गोष्टी झाल्या आहेत. राजकीय दृष्ट्या हा प्रकल्प बघू नये. हा प्रकल्प येतो आहे. यात राजकारण आणू नये, विरोध करत असतील तर चर्चा करा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.