चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 28 मे : शासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांना नेहमीच झापण्याच्या भूमिकेत वावरणारे अजित पवार कधी काय करतील याचा नेम नाही. शनिवारी भोरमध्येही एका हॉटेलच्या उद्घाटनादरम्यान कार्यकर्त्याला याचा प्रत्यय आला, निमित्त होते अजितदादांच्या हस्ते एका हॉटेल उद्घाटनाचे. पण फक्त लालफित कापून थांबतील ते अजित दादा कसले. फित कापल्यानंतर अजितदादांनी त्या हॉटेलच्या बांधकामाची बारकाईने पाहणीही केली. त्यात दादांना बाथरूम शॉवरचा हेडस्पेस कमी जाणवला. यानंतर त्यांनी थेट हॉटेल मालकालाच शॉवर खाली उभं केलं आणि बाथरूमचा हेडस्पेस किती कमी हे उदाहरणासह दाखवून दिलं.
हॉटेल उद्घाटनाला आलेल्या अजित पवारांनी मालकालाच शॉवरखाली उभं केलं#AjitPawar pic.twitter.com/dcvEzk2fu9
— News18Lokmat (@News18lokmat) May 28, 2023
दादांची कृती पाहून कार्यकर्त्यांची जोरदार करमणूक झाली खरी पण दादांना उद्घाटनाला बोलावणाऱ्या हॉटेल मालक कार्यकर्त्यांची पुरती शोभा झाली. यानंतर हॉटेल मालकासह तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनाही हसू आवरलं नाही.

)







