पुणे 26 जानेवारी : पुण्यात पैलवान काका पवार यांच्या आखाड्यात या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीं विजेते आणि उपविजेत्यांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सत्कारासाठी खास आखाड्यात आले होते. काकांच्या आखाड्यात आल्याने अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत आखाडा गाजवला. अजित पवार म्हणाले, पैलवान काका पवार यांनी प्रथमच बिन लंगोट वाल्याचा सत्कार केला असेल. आणि सत्कारात दिलं काय तर गदा. आत्तापर्यंत आम्हाला तलवारी मिळायच्या.आता ही गदा कुठं धरू असा विचार करतोय तर हा फोटोग्राफर म्हणतोय दादा गदा वर धरा.. आता तुझ्या डोक्यात घालू का असं म्हणताच आखाड्यात एकच हशा पीकली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सर्व वजनी गटातील विजेत्यांचा सत्कार अजित पवारांनी शाल श्रीफळ देऊन केला. शासन मल्लांना मानधन वाढवून देईल असं आश्वासन देताना अजित पवारांनी दिलं. जयाने हुरळून जाऊ नका पराभवाने खचू नका असं आवाहन ही अजित पवारांनी केलं.
VIDEO 'शिळ' घालून कलाकारांनी सादर केलं 'मिले सुर मेरा...' ऐकून व्हाल थक्क
महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरींना महिना 20 हजार रुपये मानधन सुरु करावे अशी मागणी काकासाहेब पवार यांनी केली. शरद पवारांची सुरक्षा काढली तर महाराष्ट्रातील पैलवानांची वानरसेना हजर असणार असंही काकासाहेब पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले, राज्याचं निधीच वाटप करताना वेगवेगळ्या खेळातील खेळाडूंना पाठींबा देण्यासाठी आर्थिक मदत देणार. तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा संकुलासाठी अर्थ संकल्पात तरतुर करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
आज, कात्रजच्या आंबेगाव खुर्दमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधिक्षक कुस्तीगीर राहुल आवारे यांचा सन्मान केला आणि या गुणवान खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या! pic.twitter.com/aw6FyccADs
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 26, 2020
प्रजेच्या हाताने लोकशाही मार्गाने जे सरकार येत त्या सरकाराने प्रजेसाठी काम करायचं असत. शाहू महाराजांनी राजाश्रय दिला. कुस्तीत काळानुरूप बदल आपल्याला करावे लागतील. खेळात जय पराजय होत असतात, त्यात खिलाडू वृत्ती जपायची असते. एक एक पैलवान तयार करताना किती कष्ट घ्यावे लागतात, किती खर्च करावा लागतो याची मला जाण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar