मराठी बातम्या /बातम्या /पुणे /राजगुरुनगर येथे शाळेत 80 मुलांना विषबाधा; राज्यात महिन्यात दुसरी घटना घडल्याने खळबळ

राजगुरुनगर येथे शाळेत 80 मुलांना विषबाधा; राज्यात महिन्यात दुसरी घटना घडल्याने खळबळ

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील 80 मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 9 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील 80 मुलांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे. सुमारे 80 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पालकही संतप्त झाले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

हुतात्मा राजगुरु विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुपारी जेवण केले. शाळेतून देण्यात येणार पोषण आहार या विद्यार्थ्यांनी घेतला होता. शाळेत पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. तो खाल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाला. सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वाचा - राज्यात 15 फेब्रुवारीपासून थंडी संपणार, हवामान विभागाकडून महत्वपूर्ण माहिती

मुलींची संख्या आधिक

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या आधिक आहे. मुलांना त्रास झाल्यानंतर त्यांना चांडोली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर उपचार करणारे डॉक्टरच दारुच्या नशेत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांना मुलांना भेटू दिले नाही. यामुळे पालक संतप्त झाले आहेत.

मागच्या महिन्यात सांगल घटना

मागच्या महिन्यात सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना अशीच अन्यातून विषबाधा झाली होती. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा समोर आले आहे. मळमळ,उलट्या, जुलाब प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवले. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, अन्न, औषध अधिकारी सुकुमार चौगुले यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेत विद्यार्थ्यांची प्रकृतीची चौकशी केली.

First published:

Tags: Pune, Pune school