पुण्यात 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित, जाणून घ्या कुठे बंदी कायम तर कुठे मिळणार सूट!

पुण्यात 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित, जाणून घ्या कुठे बंदी कायम तर कुठे मिळणार सूट!

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मेपासून सुरु होत आहे. त्यामुळे राज्यातील रेड झोन असलेल्या पुण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 04 मे: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मेपासून सुरु होत आहे. त्यामुळे राज्यातील रेड झोन असलेल्या पुण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुणे महानगर पालिकेने शहरात एकूण 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र आणि विनाप्रतिबंधित क्षेत्राबाबत मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी नवे आदेश काढले आहेत. नव्या आदेशानुसार पुण्यातील जाहीर करण्यात आलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध यापुढेही कायम राहतील. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी शासन निर्णयानुसार सवलती मिळणार आहेत.

हेही वाचा....स्वगृही परतणाऱ्या कामगारांकडून तिकीट आकारू नये, उद्धव ठाकरेंची रेल्वेला विनंती

शहरातील विनाप्रतिबंधित क्षेत्रा मधील दुकाने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेतच चालू ठेवण्यास पोलिसांची परवानगी दिल्याची माहिती

सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आहे. मात्र, एका गल्लीत फक्त 5 दुकाने सुरू ठेवता येतील, अशी अट ठेवण्यात आली आहे. तसेच नवीन ऑर्डरमध्ये वाईन शॉपबाबतचा उल्लेख मात्र टाळण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील मद्यविक्रीबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. शासन निर्णयानुसार मद्यविक्रीला परवानगी असली तरी पुणे पोलिसांकडून अद्याप कोणतेच आदेश देण्यात आलेले नाहीत.

पुण्यात नॉन कंटेनमेंट एरियात सवलती मिळाल्या असल्या तरी प्रतिबंधित भागातील नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी कायम राहील. थोडक्यात इकडून तिकडं आणि तिकडून येजा करता येणार नाही. तसंच ग्रीनमध्येही रात्रीची संचारबंदी यापुढेही कायम असणार आहे. लहान आणि वयोवृद्धांनाही वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. थोडक्यात पुणेकरांनी 'सातच्या आत घरात' यावे, असे नवे आदेशच पुणे पोलिसांनी काढले आहेत.

हेही वाचा.. चिंताजनक! देशभरात 24 तासांत कोरोनचे 2487 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 40000 वर

या प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम..

मंगळवार पेठ, जूना बाजार, पर्वती दर्शन परिसर 1, 2, पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, पर्वती दत्तवाडी, पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज 1, 2, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना भवानी पेठ, कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, उंड्री, होलेवस्ती, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत, घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, पर्वती, तळजाई वस्ती 1, 2, धनकवडी, बालाजीनगर, पर्वती शिवदर्शन 1, 2, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी, साईसमृध्दी परिसर, वडगावशेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक, लोहगाव, कालवडवस्ती, बिबवेवाडी, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, डायसप्लॉट, मीनाताई ठाकरेनगर, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी स. नं. 650, गुलटेकडी, सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी, ढोलेमळा झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर, गांधीनगर 2, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, आळंदी रोड, कळस, जाधववस्ती, येरवडा प्रभाग क्र. 6, हडपसर रामनगर, रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर सय्यदनगर 1, 2, 3, गुलामअलीनगर, कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, कोंढवा खुर्द मिठानगर, वानवडी एसआरपीएफ, शिवाजीनगर कामगार पुतळा, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, हडपसर चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी, हडपसर माळवाडी, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर.

हेही वाचा.. देशाची आर्थिक राजधानी संकटात! मुंबईत कोरोनाचे 441 नवे रुग्ण, तर 21 जणांचा मृत्यू

विनाप्रतिबंधित क्षेत्रात मिळेल ही सूट...

- प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उर्वरित मनपा क्षेत्रामध्ये व्यापारी संकुलामधील केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील.

-त्या व्यतिरिक्त रस्त्यावरील दुकांनपैकी स्वतंत्र्य दुकाने, रहिवाशी कॉलनातील दुकाने व रहिवाशी संकुलातील दुकाने उघडी राहतील.

- पुणे मनपा क्षेत्रातील एखाद्या रस्त्यावर 5 पेक्षा जास्त दुकाने असतील तर अशा रस्त्यावरील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व अत्यावश्यक सेवा नसलेली जास्तीत जास्त 5 दुकाने उघडण्याची परवानगी असेल.

- केवळ अनु्ज्ञेय कामांसाठी वैयक्ति वाहन वापरता येईल. चार चाकी वाहनामध्ये चालका व्यतिरिक्त दोन व्यक्तिंना परवानगी असेल तर दुचाकीवर केवळ एकच व्यक्ति जाऊ शकेल. मागील सीटवर कोणालाही नेता येणार नाही.

- पावसाळी कामे, मेट्रोची कामे, धोकादायक इमारतीबाबत कारवाई, पूरपरस्थिती होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या कामांना परवानगी देण्यात आली आहे.

- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर शहरी भागामध्ये बाहेरील मजूर न आणता त्याजागेवरच मजुरांची राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशी बांधकामे आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची कामे करता येतील।

- ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरपोच अत्यावश्यक वस्तूचे वितरण करता येईल.

- सर्व धार्मिक स्थळे व सार्वजनिक कार्यक्रम बंदच असतील

-कंटेन्मेंट व नॉन कंटेन्मेंट झोन मधील सर्व नागरिकांनी मास्क चा वापर करणे बंधनकारक आहे...

First published: May 4, 2020, 7:22 AM IST
Tags: pune news

ताज्या बातम्या