जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 16 डिसेंबर : भारतानं बदलला जगाचा नकाशा, 51 वर्षानंतरही आहे महत्त्व कायम, Video

16 डिसेंबर : भारतानं बदलला जगाचा नकाशा, 51 वर्षानंतरही आहे महत्त्व कायम, Video

16 डिसेंबर : भारतानं बदलला जगाचा नकाशा, 51 वर्षानंतरही आहे महत्त्व कायम, Video

16 डिसेंबर 1971 या दिवशी भारताने पाकिस्तावरील युद्धात निर्णायक विजय मिळला. पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील 16 डिसेंबर 1971 हा दिवस एक वैभवशाली पान आहे. या दिवशी भारताने पाकिस्तावरील युद्धात निर्णायक विजय मिळला. पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली. भारतीय लष्करानं या युद्धात अभूतपूर्व पराक्रम गाजवला. या पराक्रमामुळे जगाचा नकाशाच बदलला. या घटनेला आज (शुक्रवार) 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1971 च्या युद्धात सहभागी असलेले लेफ्टनंट जनरल (नि.) दत्तात्रय शेकटकर यांनी या युद्धाच्या आठवणी सांगितल्या आहेत. पाकिस्तानची फाळणी शेकटकर यांनी या युद्धाबाबत सांगितलं की, ‘कोणत्याही देशाला आपल्या सीमेचे शत्रूपासून संरक्षण करायचं असतं. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे आपल्या दोन बाजूला होते. त्या परिस्थ्तीमध्ये पाकिस्तानची फाळणी करुन देशाचं संरक्षण करणं हा उपाय आपल्या हाती होता. दहा दिवस हे पाकिस्तानचे फाळणी युद्ध झाले. अगदी कमी कालावधीमध्ये संपलेलं हे जगातील एकमेव युद्ध आहे. या युद्धामुळे देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या. 51 वर्षानंतरही महत्त्व कायम बांगलादेशच्या निर्मितीसाठी झालेल्या या युद्धाला आता 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्धाचं महत्त्व आजही जाणवतं, असं शेकटकर यांनी सांगितलं. ‘आज भारताला त्रास देण्यासाठी चीन आगळीक करत आहे. पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर चीननं सर्व बाजूनं आपल्याला त्रास दिला असता. या युद्धामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील कामगिरी तर अभिमानास्पद आहेच पण या सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताचा दबदबा वाढला. भारत हा असा एकमेव देश आहे ज्यांनी एका देशाची फाळणी करून त्यांना शांततेत एक नवीन ओळख निर्माण करून दिली. जो भूभाग भारताने त्या युद्धामध्ये जिंकला होता त्यांनी तो परत त्या देशांना केला हे फारच कमी युद्धामध्ये होते. Kolhapur : अग्निवीर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मिळणार मोफत जेवण 1971 सालच्या युद्धामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उचललेल्या कठोर पावलांमुळेच त्याचे आज 51 वर्षानंतर देखील दुर्गामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपल्या संरक्षण क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत. पण, या सर्व आव्हानांना परतावून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे निश्चित आहे. याची चुणूक म्हणून हे 1971 चे युद्ध विजय दिन म्हणून आपण साजरा करतो.

News18

भारताचा दबदबा वाढला ‘भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आजही तणावपूर्ण आहेत. पण, आपला पाकिस्तानवर दबदबा कायम आहे. या युद्धामुळे आपली बांगलादेशची सीमा सुरक्षित झाली. जागतिक स्तरावर चांगली ओळख झाली. या युद्धानंतर भारताने अतिशय समंजसपणे दोन देशांना वेगळं केलं. युद्धानंतर भूभाग परत दिला हे फार क्वचित ठिकाणी होते,’ याची आठवण शेकटकर यांनी करून दिली.

‘आज आपण रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध पाहत आहोत. हे युद्ध देखील गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. या युद्धावर आजही तोडगा निघालेला नाही. भारतानं 1971 साली केलेलं युद्ध हे कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट नियोजनाचा नमुना म्हणून पाहिले पाहिजे,’ असे शेकटकर यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात