पैसे सगळ्यांसाठी महत्वाचे असतात. मग तो गरीब असू देत किंवा श्रीमंत. तसे पाहाता आता लोकांचा बराचसा व्यवहार हा डिजिटल झाला आहे, त्यामुळे बहुतांश लोक आपल्याजवळ पैसे बाळगत नाहीत. पण असं असलं तरी एक काळ होता जेव्हा लोक खिशात पैसे ठेवायचे. या पैशांच्या नोटींवर बऱ्याच गोष्टी पेनाने लिहिलेल्या तुम्ही पाहिल्या असतील.
लिहिलेल्या नोट्स वैध ठरणार नाहीत का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशी सूचना जारी करण्यात आल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. अशा स्थितीत आता लोक विचारू लागले आहेत की, नोटेवर काही ही लिहिल्याने ती अवैध ठरते का? लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सरकारच्या पीआयबी फॅक्टचेकने दिली आहेत.