चंद्राला तुम्ही दररोज आकाशात पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, तो नेहमीच आपली जागा बदलतो. तो कधीही एका ठिकाणावर तुम्हाला देसणार नाही.
चंद्र हा सुर्यासारखाच पूर्वेला उगवतो आणि रात्री पश्चिमेपर्यंत जातो. पण असं असलं तरी तो आपली जागा नेहमी बदलतो.
चंद्र पृथ्वीभवतो फोरी मारतो आणि त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29 दिवस लागतात. तर पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात.
चंद्र आणि पृथ्वी दोघेही सुर्याभोवती फिरत असतात. ज्यामुळे दररोज आपल्याला चंद्र वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो.