काही अपवाद सोडले तर, आपण कुत्रा-मांजरीला भांडताना पहातो, त्यांच्यात भांडणं का होतात? यामागचं कारण अनेकांना ठावूक नसतं. पण याचं उत्तर आता चॅट GPTनं दिलं आहे.
कुत्रा आणि मांजरीमधील भांडणाला घेऊन जेव्हा ChartGPT ला प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने एक मजेदार कारण देत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
ChartCPTनं सांगितलं की जगभरात या दोन्ही प्राण्यांना पळिव प्राणी म्हणून सांभाळलं जातं, पण असं असलं तरी देखील ते एकमेकांचे दुश्मन आहेत.
मांजर सहसा आपला भाग किंवा परिसरावर आपलंच वर्चस्व ठेवू इच्छीते आणि हेच कुत्र्यांसोबत देखील होतं. त्यामुळे जेव्हा ही ते एकमेकांच्या परिसरात दिसतात तेव्हा एकमेकांशी भांडू लागतात. ज्यामध्ये बऱ्याचदा कुत्रा हा आकाराने मोठा असल्याने तो मांजरीवर भारी पडतो.
ChartGPT नुसार या दोघांमध्ये मैत्री होऊ शकते. जर या प्राण्यांची योग्य प्रकारे ओळख झाली तर, तसेच ते लहान पणापासून एकत्र राहिले तर त्यांच्यात मैत्री होऊ शकते.
तुम्ही काही घरांमध्ये कुत्रा आणि मांजरीला एकत्र पाहिले असणार, ते लहानपणापासून एकत्र असल्यामुळे एकमेकांचे चांगले मित्र बनतात.