तुम्ही कधी विचार केला आहे का, की जगभरातील सर्व प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढरा का असतो? नसेल तर हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला त्यामागचं खास कारण सांगणार आहोत.
वास्तविक, केसिन हे दुधात असलेले कॅल्शियम आणि फॉस्फेट यांच्या संयोगाने लहान कण तयार करतात आणि या कणांना मायसेल्स म्हणतात.
या मायकेल्सवर प्रकाश पडल्यावर तो परावर्तनानंतर विखुरला जातो आणि त्याच परावर्तनामुळे आपल्याला दुधाचा रंग पांढरा दिसतो.
ग्रामीण भागात राहून किंवा शहरात राहूनही जर तुम्ही गाईचे किंवा म्हशीचे दूध विकत घेत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की गाईच्या दुधाचा रंग म्हशीच्या दुधाच्या तुलनेत थोडा पिवळा असतो.
यामुळेच गाईचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा थोडे पातळ असतं. असं घडतं कारण गाईच्या दुधात फॅटचं प्रमाण कमी असतं. याशिवाय त्यात कॅसिनचं प्रमाणही कमी असतं, त्यामुळे गाईचं दूध फिकट पिवळं दिसतं.