बरेच लोक आपल्या हातात किंवा पायामध्ये काळा दोरा बांधतात. मात्र हा दोरा नेमका कुठे बांधायचा आणि याचे काय फायदे आहेत याच्याविषयी जाणून घेऊया. काळा दोरा बांधणं हे प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीवर अवलंबून आहे. काळा रंग वाईट नजरेपासून रक्षण करतो, असं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण हा दोरा घालतात. काही लोक ट्रेंड म्हणूनही हा काळा दोरा बांधतात. पायावर काळा दोरा बांधण्याचे काही नियम आहेत. त्यानुसार पुरुषांनी उजव्या पायावर काळा धागा बांधावा. तर महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधला पाहिजे. काळा दोरा हा दृष्ट काढण्याच्या अनेक मार्गांपैकी एक आहे. पायात काळा धागा घातल्याने तो दिसत नाही आणि व्यक्ती नकारात्मक शक्तींच्या प्रभावापासूनही दूर राहते.