अनेकवेळा जेव्हा आपल्या मनाप्रमाणे नाती जुळत नाहीत तेव्हा आपली निराशा होते. असेच काहीसे या ब्राझिलियन मॉडेलसोबत घडले. ती पुरुषांना कंटाळली होती आणि एकटी राहत होती. तेव्हा तिला जाणवले की ती एकटीच इतकी सक्षम आहे की तिला कोणाचीही गरज नाही तेव्हा तिने स्वत:शी लग्न केले. या मॉडेलचं नाव आहे ख्रिस गॅलेरा. मात्र तिचं हे नात देखील तीनच महिने टिकलं.
ब्राझीलच्या साओ पाओलो (Sao Paolo) मधील प्रसिद्ध मॉडेट ख्रिस गॅलेरा (Brazil Model Chris Galera)सध्या चर्चेत आहे. ख्रिसने सांगितले होते की, तिचा पुरुषांवरील विश्वास उडाला आहे आणि आता तिला स्वतःसोबत आयुष्य घालवायचे आहे. तिने सप्टेंबरमध्ये स्वतःशी लग्न देखील केले (Brazilian model Married Herself) पण आता तिला या नात्यातून मुक्त व्हायचे आहे. आता ती स्वतःशी घटस्फोट घेणार आहे कारण तिच्या आयुष्यात कोणीतरी प्रवेश केला आहे. तिने लग्न अगदी रीतींनुसार केलं होतं, त्यामुळे तिला घटस्फोट घेऊनच पुढील नात्यात जायचं आहे.