पण कधीकधी नकळत लोक अशा काही भेटवस्तू निवडतात ज्यामुळे नाते चांगलं होण्याऐवजी नात्यातील अंतर वाढवण्याचे कारण बनते. प्रत्यक्षात देखील या गोष्टी न देण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरला कोणत्या गोष्टी अजिबात देऊ नयेत.
काळ्या रंगाच्या वस्तू तुमच्या जोडीदाराचा आवडता रंग काळा असू शकतो, पण जर तुम्ही त्यांना काळा ड्रेस किंवा वस्तू गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात करू नका. काळा रंग हा शुभ रंग मानला जात नाही आणि जर तुम्ही त्यांना काळ्या रंगाच्या वस्तू भेट दिल्या तर त्याचा तुमच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो.
रुमाल हे गिफ्ट खूप रोमँटिक वाटते, कधी-कधी आपल्या पार्टनरला त्याची गरज असते म्हणून गरजेची वस्तु म्हणून आपण ते घेतो. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या जोडीदाराला रुमाल देणे शुभ मानले जात नाही. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांना रुमालाऐवजी इतर काही भेटवस्तू देणे अधिक योग्य ठरेल.
परफ्यूम भेटवस्तु म्हणून परफ्यूम देणे हे अगदी सामान्य झालं आहे. परंतु जेव्हा जोडीदाराला भेटवस्तू देण्याची वेळ येते तेव्हा परफ्यूम किंवा कोणत्याही प्रकारचा सुगंधीत बॉडी स्प्रे नात्यातील अंतराचे कारण बनू शकते. . असे मानले जाते की जोडीदाराला अशी भेटवस्तू दिल्याने जोडप्यांमधील संबंध बिघडू शकतात.
पेन पेन देण्याची संस्कृतीही खूप जुनी आहे, पण नात्यातील नातं घट्ट ठेवायचं असेल, तर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जोडीदाराला पेन देणं टाळा. वास्तुशास्त्रानुसार, अशा भेटवस्तू घेण्याचा आणि दिल्याने नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो.
शूज किंवा चप्पल अनेकदा पार्टनर समोरच्या व्यक्तीच्या आवडत्या वस्तू गिफ्ट करण्याच्या प्रक्रियेत आपल्या जोडीदाराला शूज किंवा सुंदर हिल्स भेट देतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की बूट नकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. हे तुम्हाला तुमच्या प्रेमापासून दूर ठेवण्यासाठी कार्य करू शकते. त्यामुळे तुमच्या पार्टनरला ते देखील देणं टाळा.