आजकाल सगळ्याच गाड्यांना ट्युबलेस टायर लोक बसवतात. इतर लोक हेच बसवतात म्हणून बहुतांश लोक ट्युबलेस टायर बसवून घेतात. पण तुम्हाला ट्यूब आणि ट्यूबलेस अशा दोन्ही टायरमधील फरक माहितीय का? यामधील फरक जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
कोणत्याही वाहनाच्या सुरक्षित प्रवासासाठी टायर महत्त्वाची भूमिका बजावतात. खाड्यातून वाचण्यासाठी, रस्त्याशी घर्षण ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे आणि योग्य टायरल गरजेचे आहे. मात्र आजकाल वाहनांमध्ये 2 प्रकारचे टायर येत आहेत. ट्यूब टायर किंवा इतर ट्यूबलेस टायर.
कोणता टायर घ्यायचा, ट्यूब टायर की ट्यूबलेस टायर असा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच असतो. आपल्याला माहीत आहे की ट्युब टायरमध्ये रबर ट्यूब असते, ज्यामध्ये हवा भरलेली असते. पंक्चर झाल्यास, ट्यूब काढून ती दुरुस्त केली जाते आणि टायर पुन्हा चांगला होतो. दुसरीकडे, ट्यूबलेस टायरमध्ये ट्यूब नसते. यामध्ये थेट टायरमध्ये हवा भरली जाते.
आता आज आम्ही तुम्हाला दोन्ही प्रकारच्या टायरचे फायदे आणि तोटे सांगत आहोत आणि या दोनमधील फरक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला योग्यती माहिती मिळेल.
सर्व प्रथम, आपण टायरमधील हवा कमी करण्याबद्दल बोलू, जेव्हा ट्यूब टायरमध्ये कमी हवा असते तेव्हा आत घर्षण वाढते ज्यामुळे उष्णता निर्माण होते. जेव्हा उष्णता निर्माण होते, तेव्हा टायर गरम होते. त्यामुळे ट्यूब टायरचे आयुष्य कमी होते. दुसरीकडे, कमी हवा असताना ट्यूबलेस टायरमध्ये घर्षण होत नाही. ज्यामुळे अशा टायरचं आयुष्य ट्यूब टायरपेक्षा जास्त असतं.
ट्यूबलेस टायर थेट रिमला जोडलेला असतो. त्यामुळे, वेगाने चालविल्यास वाहन अधिक स्थिरता आणि उत्तम स्टेबिलिटी मिळते. तर ट्यूब टायरमध्ये, ट्यूबमध्ये दाब भरला जातो. यामुळे, जास्त भार असलेल्या उच्च वेगाने वाहन चालवताना स्टेबिलिटीला प्रॉबलम येतो.
आता त्यांच्या रोलिंग रेझिस्टन्सबद्दल बोलू, टायरचा जो भाग जमिनीवर आदळतो त्याला रोलिंग रेझिस्टन्स म्हणतात. जर ट्यूब टायरमध्ये कमी हवा असेल तर ट्यूब आणि टायरमधील घर्षण वाढते. घर्षणामुळे, टायरचा रोलिंग रेझिस्टन्स देखील वाढतो, ज्यामुळे वाहन अधिक ऊर्जा खर्च करू लागते. ट्यूबलेस टायरमध्ये घर्षण होत नाही. यात रोलिंग रेझिस्टन्सची समस्या उद्भवत नाही.