advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / स्टेशनवर तिकिटांसाठी गर्दी, पण गाडीत कोणीच चढत नाही? स्थानकावर भुताटकी तर नाही ना?

स्टेशनवर तिकिटांसाठी गर्दी, पण गाडीत कोणीच चढत नाही? स्थानकावर भुताटकी तर नाही ना?

कुंभमेळ्यासाठी भाविकांना सोयीचं व्हावं म्हणून 1954 साली तात्पुरत्या स्तरावर हे रेल्वे स्थानक बांधण्यात आलं होतं.

01
घरातून निघायला उशीर झाला, भरभर गेलं नाही तर ट्रेन जाईल, तिकीटघरात पाहिलं तर रांगाच रांगा. जाऊदे पटकन चढूया ट्रेनमध्ये कोणाला काय कळतंय. प्रवास सुरू झाला आणि अचानक समोर टीसी दिसले तर.... अशा परिस्थितीत आपले फक्त कपडे ओले (घामाने) व्हायचे बाकी असतात. त्यामुळे अशी वेळ यायला नको म्हणून आपण उशीर झाला तरी चालेल पण विनातिकीट प्रवास टाळतो. परंतु तुम्हाला माहितीये का? उत्तर प्रदेशच्या एका रेल्वे स्थानकात प्रवासी तिकीट काढतात परंतु प्रवास करत नाहीत.

02
असं कसं? प्रश्न पडला ना तुम्हालासुद्धा? खरंतर हे प्रवासी आता आताच नाही, तर तब्बल 18 वर्षांपासून असे तिकीट विकत घेऊन पैसे वाया घालवतात. बरं एक दोन नाही हं...दररोज चांगली 50-50 तिकीटं विकत घेतली जातात. अहो, तिकीट काढण्यासाठी एक समितीच गठीत करण्यात आली आहे. परंतु ट्रेनमध्ये मात्र कोणीच चढत नाही. ही अजब गजब कथा आहे, प्रयागराजच्या दयाळपूरमधील एका रेल्वे स्थानकाची.

03
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. या कुंभमेळ्यासाठी भाविकांना सोयीचं व्हावं म्हणून 1954 साली तात्पुरत्या स्तरावर हे रेल्वे स्थानक बांधण्यात आलं. कुंभमेळा झाला की ते पाडलं जायचं, कुंभमेळा आला की पुन्हा बांधलं जायचं. हे असं सुरूच होतं. मात्र काही वर्षांनी येथील स्थानिकांनी आम्हाला तात्पुरतं नाही, याठिकाणी कायमचं रेल्वे स्थानक हवं आहे, अशी मागणी केली. त्यावेळी देशाच्या पंतप्रधानपदी पंडित जवाहलाल नेहरू होते. त्यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचली.

04
पंतप्रधानांनी लक्ष घातल्यावर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांच्या कालावधीत दयाळपूर स्थानकाची पायाभरणी झाली. अखेर 1958 साली हे स्थानक सुरू झालं, हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि गाड्याही धावू लागल्या. तब्बल 47 वर्ष या परिसरातील 25 हून अधिक गावांतील लोकांनी या रेल्वेगाड्यांतून प्रवास केला. परंतु 2005 साली हे स्थानक बंद करण्यात आलं, ते आजपर्यंत सूरू झालेलं नाही.

05
मुख्य मार्गावरील रेल्वे स्थानकात दररोज 50 तिकिटांची विक्री होणं अनिवार्य असतं. तर, उपमार्गावरील स्थानकात दररोज 25 तिकिटांची विक्री होणं गरजेचं असतं. या अटी पूर्ण न झाल्यास सदर रेल्वे स्थानक बंद करण्यात येतं. दयाळपूर स्थानकावरून सध्या केवळ प्रयागराज संगम अयोध्या कॅन्ट नावाची एकाच रेल्वे थांबते. तिकीट विक्री वाढल्यास अधिकाधिक गाड्या थांबतील, असं स्थानकाचे प्रभारी पुनीत सिंह यांनी सांगितलं. मात्र कधीतरी हे स्थानक पूर्वीसारखं सुरू होईल या आशेने येथील ग्रामस्थ दररोज 50 तिकीटं विकत घेतात परंतु प्रवास करत नाहीत.

  • FIRST PUBLISHED :
  • घरातून निघायला उशीर झाला, भरभर गेलं नाही तर ट्रेन जाईल, तिकीटघरात पाहिलं तर रांगाच रांगा. जाऊदे पटकन चढूया ट्रेनमध्ये कोणाला काय कळतंय. प्रवास सुरू झाला आणि अचानक समोर टीसी दिसले तर.... अशा परिस्थितीत आपले फक्त कपडे ओले (घामाने) व्हायचे बाकी असतात. त्यामुळे अशी वेळ यायला नको म्हणून आपण उशीर झाला तरी चालेल पण विनातिकीट प्रवास टाळतो. परंतु तुम्हाला माहितीये का? उत्तर प्रदेशच्या एका रेल्वे स्थानकात प्रवासी तिकीट काढतात परंतु प्रवास करत नाहीत.

    MORE
    GALLERIES