या लग्नाच्या फोटोंमध्ये सीमा हैदर लाल रंगाच्या साडीमध्ये असून सचिनने सूट घातला आहे. सीमाने सांगितले की, मी स्वतः कधीही साडी नेसलेली नाही, माझी आई साडी नेसते.
सीमा हैदर यांनी भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी तिच्या वकिलामार्फत राष्ट्रपतींना अर्ज पाठवला आहे. या अर्जात सीमा हैदरने सचिन मीनासोबत लग्नानंतरचे सर्व फोटोही पाठवले आहेत.
सीमा हैदरने सांगितले की, आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ आहोत. सीमा म्हणाली की, माझ्या जन्मापासून सैन्यात असलेल्या माझ्या काकांसोबत माझा काही एक संबंध नाही.
सीमा हैदर म्हणाली की, मी भारताच्या व्हिसासाठीही प्रयत्न करत होते. यामध्ये दूतावासाची चूक असेल, त्यांनी मला व्हिसा द्यायला हवा होता. मग मला असं भटकावं लागलं नसतं.
सीमा म्हणाली की, पाकिस्तानच्या नावाने मला भीती वाटते. मला तिथे जायचे नाही, माझ्या मागे काही नाही. मी सचिनशिवाय जगू शकत नाही.
सीमा म्हणाली की, "मी आयुष्यात कधीही घराबाहेर पडले नाही. पहिल्यांदा मी त्यांना भेटायला आले आणि दुसऱ्यांदाही त्यांनाच भेटायला आले."