advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / आता मुलांचं दिसणं आणि गुणही पसंतीनुसार ठरवता येणार; लॅबमध्ये जन्मणार 'डिझायनर' बाळं

आता मुलांचं दिसणं आणि गुणही पसंतीनुसार ठरवता येणार; लॅबमध्ये जन्मणार 'डिझायनर' बाळं

विज्ञानाच्या जगात दररोज नवनवीन संशोधन होत असतं. शास्त्रज्ञ दररोज त्यांच्या नवनवीन चमत्कारांनी जगाला चकित करत असतात. जपानी शास्त्रज्ञांनी आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट केली आहे. या आश्चर्यावर आधीच संशोधन केले जात होतं. खरं तर, लॅबमध्ये बाळं तयार करणाऱ्या संशोधनात शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे.

01
डेलीमेलच्या वृत्तानुसार, जपानी शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की त्यांना प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणू तयार करण्यात यश आलं आहे. पाच वर्षांत लॅबमध्ये बाळ बनवणं शक्य होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर, प्रयोगशाळेत उंदरांचे शुक्राणू आणि अंडी बनवण्यात वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.

02
क्युशू विद्यापीठातील जपानी शास्त्रज्ञ प्रोफेसर कत्सुहिको हयाशी यांनी आधीच उंदरांमधील प्रक्रियेचा शोध घेतला आहे. त्याना असा विश्वास आहे की ते मानवांमध्ये असे यशस्वी परिणाम मिळविण्यापासून फक्त पाच वर्षे दूर आहेत. आता हे परिणाम मानवांवर लागू करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे संशोधन या मार्चमध्ये 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध झालं आहे.

03
2028 पर्यंत, प्रयोगशाळेत मुलाचा जन्म एक वास्तविकता होईल. प्रोफेसर कत्सुहिको यांनी सांगितलं की, जे तंत्र उंदरांवर वापरले गेले आहे, ते लवकरच मानवी पेशींवर वापरले जाईल. या तंत्राने दोन पुरुषही पिता बनू शकतात. म्हणजे समलिंगी पुरुषही पिता बनू शकतात.

04
प्रोफेसर कत्सुहिको आणि त्यांच्या टीमने नुकताच हा प्रयोग आपल्या नावावर केला आहे. त्यांनी प्रयोगशाळेत सात उंदीर विकसित केले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे जैविक पालक दोघेही नर उंदीर होते. प्रोफेसर कत्सुहिको यांनी सांगितलं की, या संशोधनात नर उंदरांच्या त्वचेच्या पेशींचा वापर करून अंडी आणि शुक्राणू तयार करण्यात आले.

05
प्रयोगशाळेत मानवी शुक्राणू आणि अंडी विकसित करण्याच्या क्षमतेला इन विट्रो गेमोजेनेसिस (IVG) म्हणतात. विट्रो गेमोजेनेसिसमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या रक्त किंवा त्वचेपासून पेशी घेऊन सेल तयार केल्या जातात.

06
या पेशी अंडी आणि शुक्राणूंच्या पेशींसह शरीरातील कोणतीही पेशी बनू शकतात. याचा वापर नंतर भ्रूण तयार करण्यासाठी आणि महिलांच्या गर्भाशयात रोपण करण्यासाठी केला जाऊ शकतो. या यशस्वी संशोधनानंतर, शास्त्रज्ञ मानवी शुक्राणू आणि अंडी तयार करण्याच्या अगदी जवळ आले आहेत, परंतु अद्याप भ्रूण तयार करू शकलेले नाहीत.

07
प्रोफेसर कत्सुहिको यांनी सांगितले की, याचा मोठा फायदा म्हणजे कोणत्याही वयोगटातील महिलेला मूल होईल. मात्र, या तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याचा धोकाही त्यासोबत वाढणार आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की या तंत्राने अशी मुले जन्माला येऊ शकतात जी पालकांना पाहिजे त्या गुणांसोबत तयार होतील. म्हणजे भविष्यात डिझायनर मुलांना लॅबमध्ये तयार करता येईल

  • FIRST PUBLISHED :
  • डेलीमेलच्या वृत्तानुसार, जपानी शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की त्यांना प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणू तयार करण्यात यश आलं आहे. पाच वर्षांत लॅबमध्ये बाळ बनवणं शक्य होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर, प्रयोगशाळेत उंदरांचे शुक्राणू आणि अंडी बनवण्यात वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.

    MORE
    GALLERIES