टेपचा हा शेवटचा भाग तुम्ही नीट पाहिलंय? इंज मोजण्याच्या या पट्टीला शेवटी धातूचा एक भाग असतो. या भागाचा वापर तुम्ही एखाद्या गोष्टीचे मोजमाप करत असता तेव्हा तुम्ही कोणाचीही मदत न घेता तुमचे काम सहज करू शकता. हा वाकलेला भाग एका बाजूला अडकवून, आपण कोणत्याही मदतीशिवाय कोणत्याही गोष्टीचे अंतर सहजपणे मोजू शकता.
काही खोडरब्बर किंवा रब्बर वेगवेगळ्या रंगाचे का असतात? रब्बरचा डार्क रंग शाई पुसण्यासाठी आणि हलका गडद रंग हा पेन्सिल पुसण्यासाठी आहे. असा विचार बरेच लोक करतात. पण याचं उत्तर काही वेगळंच आहे. खरं तर, दोन्ही बाजू पेन्सिल लेखन पुसण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, हलकी बाजू पातळ कागदावर वापरली जात आहे आणि गडद बाजू जाड कागदावर वापरली जाते.