नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमानचा अपघात झाला आहे.
काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळलं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.
आतापर्यंत 36 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, विमान कंपनी आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.