या व्यक्तीने बळी दिलेल्या बकऱ्याचं मांस सर्व नातेवाईकांना दिलं आणि त्याचं डोकं आपल्याजवळ ठेवलं. यादरम्यान तरुणाने बकऱ्याचं कच्चं मांस खाल्ल्याने त्याला जीव गमवावा लागला.
या तरुणाच्या विंडपाइपमध्ये बकरीचा डोळा अडकल्याने त्याला श्वास घेता येत नव्हता. यामुळे त्याचा मृत्यू झाला.
सूरजपूरच्या मदनपूर गावात राहणारे 50 वर्षीय बागर साई यांनी नवस पूर्ण केल्यानंतर खोपा धाममध्ये पोहोचून बकरीचा बळी दिला होता. त्यानंतर ते बकरीचं मांस घेऊन घरी पोहोचले.
यादरम्यान त्याने त्याच्या मित्रांसह दारू पिण्याचा बेत आखला आणि तिघेही दारू पिण्यासाठी सूरजपूरला पोहोचले. मद्य प्राशन केल्यानंतर असं काही घडलं की मृताचे मित्रही हैराण झाले आहेत.
दारू पार्टी केल्यानंतर तिन्ही मित्रांनी बकऱ्याचं डोकं शिजवण्याची तयारी सुरू केली. यादरम्यान बागरने कच्चे मांस खाण्याचा हट्ट धरला, मात्र मित्रांनी त्याला तसं न करण्यास सांगितलं.
परंतु, त्याच्या हट्टीपणामुळे बागरने बकरीचा डोळा बाहेर काढला आणि तो कच्चा खाण्यास सुरुवात केली. डोळा त्याच्या घशात अडकला आणि श्वास घेता न आल्याने त्याला प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
बागर यांच्या गळ्यात शेळीचा डोळा अडकल्याचं त्यांच्या मित्रांनी सांगितलं, त्यानंतर त्यांनी त्याला पाणी पिण्यास सांगितलं, मात्र त्यानी नकार दिला आणि काहीच वेळात त्याचा मृत्यू झाला.