होय, तुम्ही बरोबर वाचलं आहे. या देशात मधमाशांचं अपहरण होत आहे. 2011 पासून येथे 10 लाखांहून अधिक मधमाशांचं अपहरण झालं आहे. तसंच सुमारे 135 मधमाश्यांच्या पोळ्या चोरीला गेल्या आहेत.
या अपहारांमुळे वर्षानुवर्षे मधमाशी पालन करणाऱ्या अशा अनेक शेतकऱ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला. मधमाशा गायब झाल्यामुळे मध तयार होत नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे.
स्किडब्रुक, लिंक्स येथे राहणारे 60 वर्षीय गाए विल्यम्स यांनी सांगितलं की, गेल्या वीस वर्षांत त्यांच्या अनेक राण्यांचं अपहरण करण्यात आलं.
राणी मधमाशी गायब होताच बाकीच्या माशाही नाहीशा होतात. ते म्हणाले की, हे अपहरणकर्ते अतिशय हुशार आहेत.
मधमाशी उत्पादनात त्यांच्यापासून मध तयार होतो, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते फक्त राणी मधमाशांचं अपहरण करत आहेत.
आतापर्यंत या अपहरणकर्त्यांचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. मात्र, अनेक वर्षांपासून तपास सुरू आहे.