सीमंत या शब्दाचा अर्थ म्हणजे सीमा किंवा बॉन्ड्री. यासाठी नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय नववधूच्या घरी पूजा करायला येतात.
आजकाल या समारंभात काही बदल झाले आहेत, कारण पूर्वी हा सोहळा लग्नाआधी होत असे पण आजकाल सिमंत पूजन समारंभ लग्नाच्या दिवशीच होतो.
पूर्वीच्याकाळी लग्नविधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे व-हाडी वधूच्या गावी येत असत. वराचे गावाच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी वधूचे आई-वडील जातात आणि तिथे त्याचे पूजनही केले जाई. त्या पूजेला ‘सीमांत पूजन’ असे म्हणतात.
यामध्ये नवरदेवाची पूजा वधूच्या आईकडून केली जाते, यामध्ये नववधूची आई वराचे पाय पाण्याने स्वच्छ करते आणि कुंकुम तिलकही लावते आणि आरतीही करते आणि त्याला भेटवस्तू देखील देते. त्यानंतर वराची आई त्यांच्या भावी सूनेला साड्या आणि दागिने यांसारख्या भेटवस्तू देतात.
त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांना वधू पक्षाकडून गोडधोडाचं जेवण दिलं जातं. त्यानंतर दुपारचं जेवण देखील नववधूच्या कुटुंबीयांकडून दिलं जातं. अशा प्रकारे सिमंत पूजन सोहळा आनंदात संपन्न होते.
तसे पाहाता आता बहुतांश भागात, मुख्यता मुंबईत वेळे अभावी हा कार्यक्रम होत नाही. पण असं असलं तरी महाराष्ट्रातील अनेक भागात हा कार्यक्रम होतो. मुख्यता गावच्या ठिकाणी जिथे नववधूच्या दारात लग्न लावली जातात. तेथे ही विधी मुख्यत: पाहिली जाते.