पाणी हे आपल्या शरीराची गरज आहे. पाण्याशिवाय माणूस जगूच शकणार नाही. हे तर आपल्याला माहितीय. तसेच पाण्याबद्दल बोलायचे झाले तर लोक असं देखील म्हणतात की, पाणी कधीच खराब किंवा शिळं होत नाही. पण मग असं असलं तर पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? अनेकांना हा प्रश्न पडला आहे. पण त्याचं उत्तर मात्र फार कमी लोकांना ठावूक असेल.
असे म्हटले जाते की ही तारीख ग्राहकांना बंद वस्तूचा दर्जा आणि सुरक्षिततेचा कालावधी काय आहे हे सांगते. पण मग पाण्याची एक्सपायरी डेट सांगायची गरज का? बंद बाटलीतलं पाणी आपण कधीही पिऊ शकत नाही का?
यासंदर्भात एक अहवाल समोर आला आहे, ज्यानुसार एक्सपायरी डेटनंतर, पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि ते वापरासाठी सुरक्षित असू शकत नाही.
सुरक्षितता आणि आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. वापरलेल्या जुन्या पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा कालावधी दर्शविण्यासाठी बाटलीमध्ये पाण्याची एक्सपायरी डेट लिहिली जाते. ही तारीख निर्मात्याद्वारे निश्चित केली जाते.
दुसर्या अहवालानुसार, ती एक्सपायरी डेट पाण्याची नाही तर त्या बाटलीची असते. एका ठराविक वेळेनंतर प्लास्टिक पाण्यात विरघळू लागते आणि त्यामुळेच बाटलीवर एक्स्पायरी डेट लिहिली जाते.