800 वर्षांपूर्वीच्या mummy चा शोध; सांगाड्याजवळ भाजीपाला आणि हत्यारं, पाहा Photos
मानवी सांगाडे किंवा ममी सापडण्याच्या घटना या आतापर्यंच इजिप्तमध्येच घडतात, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असेल. परंतु आता पेरूमध्ये तब्बल 800 वर्ष जूनी ममी सापडली आहे, त्यामुळं आता सोशल मीडियावर त्याचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत.
पेरू या देशातील लीमा शहराच्या परिसरात 800 वर्षांपूर्वीच्या एका mummy चा म्हणजेच मानवी सांगाड्याचा शोध लागला आहे. त्याचबरोबर या mummy बरोबर भाजीपाला आणि काही हत्यारंदेखील सापडली आहेत.
2/ 5
Archaeologist पीटर वान डेलन लूना यांनी याविषयी बोलताना म्हटलंय की ही ममी लीमा क्षेत्रात शोधली गेली होती. आता हा मानवी सांगाडा पुरूषाचा आहे की स्त्रीचा हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
3/ 5
या ममीच्या पूर्ण शरीराला दोरीनं बांधण्यात आलं आहे आणि चेहरा झाकण्यात आला आहे. ही त्या काळातील अंत्यसंस्कारांची पद्धत असू शकते. असं स्टेट यूनिवर्सिटी ऑफ सॅन मार्कोसचे वॅन डालन लूना यांनी म्हटलं आहे.
4/ 5
लीमा शहराच्या आसपासच्या परिसरात जमिनीखाली ही ममी सापडली आहे. त्यात चीनी मातीच्या वस्तू आणि दगडी हत्यारंदेखील सापडली आहेत.
5/ 5
पेरू हा देश इंका साम्राज्याच्या आधी आणि नंतर शेकडो आर्कियोलॉजिक स्थानांचं घर राहिलेलं आहे. त्याचा प्रभाव हा दक्षिणी इक्वाडोर आणि कोलंबियापासून तर मध्य चिली पर्यंत तब्बल 500 वर्ष होता.