जगात असे अनेक लोक आहेत, जे विचित्र गोष्टींना खातात, ज्याबद्दल आपण विचार देखील करु शकणार नाही. खरंतर कोणतेही पदार्थ खालले तर त्याचा आपल्या पचनशक्तिवर परिणाम होतो. जरी ते पचले तरी ते त्यांच्यामध्ये असलेल्या बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढू शकत नाही. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे कोरोना विषाणू, जो वटवाघुळांच्या संपर्कात येऊन किंवा खाल्ल्याने मानवापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जातो.
आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात विचित्र 7 स्नॅक्स सांगणार आहोत, जे जगभरात आवडीने खाल्ले जातात. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला उलटी येईल.
अननस सँडविच - सर्वप्रथम, एका साध्या नाश्त्यापासून सुरुवात करूया, जो फळाशी जोडलेला आहे. फळ आपण खातो, त्यात काही विचित्र नाही पण ते ज्या पद्धतीने खाल्लं जातं ते विचित्र आहे. येथील लोक ब्रेडच्या स्लाईसमध्ये अननस भरुन त्यामध्ये मेयो किंवा इतर पदार्थ भरुन खातात.
टूना आयबॉल्स- जपान आणि चीन घृणास्पद पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे टुना आयबॉल्स नावाचा एक विचित्र नाश्ता आहे. टूना फिशचे डोळे शिजवून बनवलेली ही डिश आहे. मोमोज सारखे या माशांच्या डोळ्यांना वाफवून घेतलं जातं आणि मग लसूण, सोया सॉस, लिंबू बरोबर सर्व्ह केलं जातं.
तळलेले टॅरंटुला - जर तुम्हाला मासे पाहून किळस येत असेल, तर जरा थांबा, कारण कंबोडियामध्ये याहूनही घृणास्पद पदार्थ स्नॅक्स म्हणून खाल्ले जातात. येथे टॅरंटुला कोळी तळून खातात. 1970 च्या दशकात पोल पॉट नावाचा हुकूमशहा कंबोडियात होता तो तिथला पंतप्रधानही झाला. त्याच्या काळात खाण्यापिण्याची एवढी टंचाई होती की लोक जे खायला मिळेल ते खात असत. फक्त याच कारणासाठी तेथील लोक कोळी तळून खाऊ लागले. तेथील आजही काही लोक हे खातात.
कँडीड खेकडे- खेकडे जगाच्या अनेक भागात खाल्ले जातात पण जपानमध्ये खेकड्यांशी संबंधित एक डिश आहे, Candied Crab जी अतिशय घृणास्पद आणि विचित्र आहे. येथे खेकड्यांचे बाळ तळून वितळलेल्या साखरेत बुडवून त्यावर काही मसाले टाकले जातात. हा स्नॅक जपानमध्ये बटाट्याच्या चिप्ससारख्या पॅकेटमध्ये पॅक करून विकला जातो.
सैलो- युक्रेनमध्ये एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे, ज्याला सैलो म्हणतात. जर तुम्ही डाएटिंग करत असाल तर या डिशपासून दूर राहा कारण प्रत्यक्षात ही डिश पोर्क फॅटपासून बनवली जाते. हे पूर्व युरोपमध्ये अनेक ठिकाणी खाल्ले जाते आणि लोकांना वोडकाच्या शॉट्ससह ते कच्चे खायला आवडते.
चिकन बट- चिकन बट डिश तैवानमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, ही एक डिश आहे जी कोंबडीचा मागील भाग तळल्यानंतर विकली जाते.
तळलेले खडे- आता जर तुम्हाला प्राणी आणि फळांचे विचित्र रूप पाहून कंटाळा आला असेल तर या चायनीज डिशबद्दल जाणून घ्या, ज्याला लोक खातात तरी कसं? असा प्रश्न तुमच्या मना उपस्थीत राहिल. इथे पेबल्स म्हणजेच छोटे खडे तळून खाल्ले जातात. या स्नॅक्सचे नाव सुओ डियू आहे.