गेल्या दीड महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन्ही मुली मारिया वोरोंत्सोवा आणि कतरिना तिखोनोव्हा यांच्यावर बंदी घातली आहे. वडिलांच्या काही मालमत्तेवर त्यांचा ताबा असू शकतो, असं अमेरिकेला वाटतं. पुतीन यांच्या दोन्ही मुली काय करतात? दोघे कुठे राहतात? चला जाणून घेऊया त्याच्या Secret आयुष्याबद्दल... (फोटो- एपी)
पुतिन यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाला मीडियापासून दूर ठेवले आहे. तिखोनोवा एक व्यावसायिक महिला आहे आणि वोरोंत्सोवा एक डॉक्टर आहे. त्या दोघी त्यांची माजी पत्नी ल्युडमिला पुतीन यांच्या मुली आहेत. पुतीन यांनी 2013 मध्ये ल्युडमिलाला घटस्फोट दिला.
पुतीन आपल्या मुलींबद्दल बोलले तेव्हा फक्त दोनच प्रसंग आले आहेत. तेव्हाही त्यांनी त्यांची नावं घेतली नाहीत. 2015 च्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मुलांबद्दल बोलून सर्वांना आश्चर्यचकित केले. पुतीन म्हणाले होते, 'त्यांनी फक्त रशियन विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं. मला त्यांचा खूप अभिमान आहे.' (फोटो-एपी)
Lyudmila and putin : पुतीन नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच खाजगीपण जपतात. 2008 मध्ये, त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले, 'सार्वजनिक व्यक्ती कशा जगतात, हे जाणून घेण्याचा समाजाला अधिकार आहे. पण यामध्येही मर्यादा आहे.'
डेली मेलमधील वृत्तानुसार, सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जाण्यापूर्वी पुतिन यांची मोठी मुलगी मारिया वोरोंत्सोवाने पूर्व जर्मनीमध्येही शिक्षण घेतले. नंतर ती मॉस्कोमधील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला आणि लोक तिला एंडोक्रिनोलॉजिस्टचे डॉक्टर म्हणून ओळखतात. अहवालात असं म्हटलंय की मारियानं डच उद्योगपती जोरीट फासेनशी लग्न केले आहे आणि ती नेदरलँड्समधील दक्षिण हॉलंड प्रांतात तिच्या कुटुंबासह राहते. 2019 मध्ये रशिया 1 या टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्याविषयी रंजक माहिती देण्यात आली होती. तिच्या मुलाखतीत तिने खुलासा केला की ती एका मेडिकल फर्मची मालकीण आहे. (व्हिडिओ ग्रॅब)
पुतिन यांची धाकटी मुलगी कतरिना हिनं मॉस्को विद्यापीठात काम केलं आहे. रॉक अॅण्ड रोल डान्सर म्हणून ती तिच्या यशासाठी ओळखलं जातं. 2015 मध्ये, न्यूज एजन्सी रॉयटर्सनं उघड केले की, पुतीन यांच्या मुलीनं वर्ल्ड रॉक अॅण्ड रोल इव्हेंटमध्ये भाग घेतला होता.