तुर्कीत भूकंपात 4 हजार मृत्यू, इमारती उद्ध्वस्त; भारत मदतीसाठी धावला
तुर्की आणि सीरियात आतापर्यंत भूकंपामुळे ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढत असून ती २० हजार पर्यंत पोहोचू शकते अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर जगभरातून मदतीचा हात दिला जात आहे. भारतानेही स्पेशल विमान सी१७ ग्लोबमास्टर पाठवले असून ५१ जवानांची तुकडी तुर्कीत दाखल झाली आहे.
2/ 6
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवर सांगितलं की, ५० पेक्षा जास्त जवानांची पहिली तुकडी तुर्कीत पोहोचली आहे. यात बचावकार्य करणारे जवान, प्रशिक्षित डॉग स्क्वाड, ड्रिलिंग मशीन याशिवाय इतर साहित्य आहे.
3/ 6
हवाई दलाचं दुसरं विमान इतर जीवनावश्यक साहित्यासह रवाना होण्यासाठी तयार असल्याचंही परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं. तुर्कीसाठी भारतीय लष्कराच्या ८९ सदस्यांची फिल्ड रुग्णालय आणि मेडिकल टीम रवाना झालीय.
4/ 6
लष्कराच्या मेडिकल टीममध्ये क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट याशिवाय इतर स्पेशालिस्टही आहेत. एक्स रे मशिन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कार्डियाक मॉनिटर इत्यादी साहित्यसुद्धा पाठवण्यात आले आहे.
5/ 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपानंतर ट्विटरवरून यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच तुर्कीतील भूकंपग्रस्तांना भारताकडून आवश्यक ती मदत पुरवण्यात येईल असंही ते म्हणाले होते.
6/ 6
तुर्की आणि सीरियात आतापर्यंत भूकंपामुळे ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढत असून ती २० हजार पर्यंत पोहोचू शकते अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.