ब्रॉडकॉमचे सीईओ टॅन हॉक इंग (Tan Hock Eng) यांना कोरोना महामारीदरम्यान सर्वाधिक 1,586 टक्के बोनस मिळाला. त्यांना 2020 मध्ये $3.6 दशलक्ष आणि 2021 मध्ये $60.7 दशलक्ष बोनस म्हणून मिळाले.
Oracle CEO सफरा अॅडा कॅटझ (Safra Ada Catz) यांचा बोनस महामारीच्या काळात 999.52% ने वाढला. त्यांना 2020 मध्ये $1 दशलक्ष आणि 2021 मध्ये $10.6 दशलक्ष बोनस मिळाला.
इंटेलचे सीईओ पॅट्रिक गेल्सिंगर (Intel CEO Patrick Gelsinger) यांचा बोनस 712.64% ने वाढला. त्यांना 2020 मध्ये $22 दशलक्ष आणि 2021 मध्ये $179 दशलक्ष बोनस मिळाला.
Appleचे सीईओ टिम कुक (Tim Cook) हे देखील सर्वाधिक बोनस मिळवणाऱ्यांपैकी एक होते. त्याच्या बोनसमध्ये 571.62% ची वाढ झाली. त्याला 2020 मध्ये $14.7 दशलक्ष आणि 2021 मध्ये $98.7 दशलक्ष बोनस म्हणून मिळाले.
अॅमेझॉनचे अँडी जॅसी (Andy Jassy) हेदेखील महामारीच्या काळात जास्त बोनस मिळवणाऱ्या सीईओंमध्ये आघाडीवर राहिले. त्याचा बोनस 491.9% ने वाढला. त्यांना 2020 मध्ये $35.8 दशलक्ष आणि 2021 मध्ये $211.9 दशलक्ष बोनस मिळाला.