2003 मध्ये, पुतीन यांचं नाव स्वेतलाना क्रिवोनोगिही यांच्याशी जोडलं गेलं होतं. या त्यांच्या आलिशान घरात घरगुती मदतनीस म्हणून काम करत होत्या. मीडियामध्ये असं वृत्त आहे की, पुतिन यांना स्वेतलानापासून एक मुलगीदेखील आहे. तिचं नाव लुईझ रोझोवा आहे. स्वेतलाना क्रिव्होनोगिख आता तिची मुलगी लुईझा रोझोवासोबत मोनॅकोमध्ये राहतात. तिथं त्यांच्या मालकीचं 4.1 दशलक्ष डॉलर्सचं अपार्टमेंट आहे. हे यापूर्वी Pandora Papersमध्ये उघड झालं होतं. लुईझा रोझोवा यांना एलिझावेटा क्रिव्होनोगिख असंही म्हणतात. (Twitter Image)
व्लादिमीर पुतीन यांचं नाव अॅना चॅपमन या रशियन गुप्तहेर महिलेसोबतही जोडलं गेलं आहे. ती एक मॉडेल देखील आहे. मात्र, पुतिन किंवा चॅपमन या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे बोललेलं नाही. अलीकडेच अॅना चॅपमनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. कारण, ती युक्रेनच्या मुद्द्यावर व्लादिमीर पुतीन यांचे समर्थन करत होती आणि रशियन सैन्याच्या हल्ल्याचं समर्थन करत होती. (Instagram)
व्लादिमीर पुतिन यांचं नाव रशियन ऑलिम्पिक जिम्नॅस्ट अॅलीना काबाएवा हिच्याशीही जोडलं गेलं आहे. पुतीन यांनी काबाएवाशी लग्न केले आणि दोघांना चार मुलं- दोन जुळ्या मुली आणि दोन मुलं असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. या सर्वांचा जन्म स्वित्झर्लंडमध्ये झाला. असंही म्हटलं जातं की, अॅलिना काबाएवा ही मुस्लिम होती आणि व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला. (FB Photo)