Russia Ukraine युद्धात मारियुपोल उद्ध्वस्त, सर्वत्र पडलेले मृतदेह, पहा भयानक दृश्य
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध 48 व्या दिवशी पोहोचले आहे. युद्धादरम्यान जी चित्रे समोर येत आहेत ती रडायला लावणारी आहेत. ताज्या माहितीनुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये आतापर्यंत 720 मृतदेह सापडले आहेत. मृत सर्व नागरिक आहेत. त्याचवेळी 200 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मारियुपोल शहरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. चित्रांमध्ये पाहा ताजी परिस्थिती... (सर्व फोटो-एपी)
|
1/ 7
मारियुपोल हे अझोव्ह समुद्रावरील एक बंदर शहर आहे. डॉनबासच्या दोनेत्सक विभागातलं हे दुसरं मोठं शहर आहे. बंदर शहर असल्यानं रशियाला ते काबीज करायचं होतं. पण युक्रेनलाही मारियुपोल आपल्या हातातून सोडायचे नव्हते. यामुळेच येथील युद्ध अत्यंत भयावह होते.
2/ 7
शहरात अशी एकही इमारत उरलेली नाही, ज्यावर क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला नाही, बॉम्ब टाकले गेले नाहीत. निवासी इमारती, थिएटर, सिनेमा हॉल, मॉल्स, रेस्टॉरंट सर्व जळून खाक झालं आहे. बॉम्बस्फोटांमुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
3/ 7
रस्त्यावर ठिकठिकाणी तुटलेल्या आणि जळलेल्या गाड्या, बस आणि ट्राम पडलेल्या दिसत आहेत. त्याच वेळी, रशियन सैन्य आणि दोनेत्सक सशस्त्र सैनिकांचं तात्पुरती चेक पोस्ट तयार केली होती. ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची झडती घेऊनच त्यांना रस्त्यावरून जाऊ दिलं जात होतं.
4/ 7
रशियानं दोनेत्सकला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांनीही डॉनबासला युक्रेनमध्ये परत आणणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. याच कारणानं मारियुपोल शहर आता रशियन सैन्य आणि डोनेत्सक सशस्त्र सैन्याच्या ताब्यात आहे.
5/ 7
युक्रेनच्या हवाई दलानं दावा केला आहे की, त्यांनी रशियन सैन्याचे 300 वे हवाई लक्ष्य नष्ट केले आहे. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासूनची ही आकडेवारी आहे. हवाई दलानं सांगितलं की, त्यांनी रशियन सैन्याचं सुखोई एसयू-25 लष्करी विमान नष्ट केले.
6/ 7
रशियन सैन्याने कीवच्या आसपासच्या भागात सर्वाधिक कहर केला. युक्रेनच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कीवच्या परिसरातील अनेक गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
7/ 7
युक्रेनच्या सशस्त्र दलाने दावा केला आहे की, युद्धात आतापर्यंत 19,500 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनने 732 रशियन रणगाडे आणि 157 विमानंही नष्ट केली आहेत.