रशियाने 18 मार्च 2022 रोजी युक्रेनच्या पश्चिम भागात लष्करी सशस्त्र डेपोवर हल्ला करण्यासाठी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर केला. मात्र, रशिया, चीन आणि अमेरिका विकसित करत असलेल्या पुढील पिढीच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांमुळे राष्ट्रीय आणि जागतिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली त्यांच्या गतिशीलमुळे तसेच हल्ल्याच्या पद्धतीमुळे एक मोठे आव्हान ठरणार आहेत. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची दिशा मार्गात असतानाही बदलू शकत असल्याने, त्यांचं संपूर्ण निरीक्षण करावं लागतं. आणखी एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे ही क्षेपणास्त्रे वातावरणाच्या वेगवेगळ्या भागांतून जातात.
नवीन हायपरसॉनिक शस्त्रे सबसॉनिक क्षेपणास्त्रांपेक्षा वेगाने लक्ष्याकडे जातात, परंतु त्यांचा वेग आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपेक्षा खूपच कमी आहे. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडे वेगवेगळ्या प्रदेशात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मजबूत यंत्रणा नाही. रशिया आणि चीनमध्येही अशा प्रणालीचा अभाव आहे.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करू शकतं. याचा वेग समुद्रसपाटीला ताशी 1,225 किलोमीटर आणि 35,000 फूट उंचीवर 1,067 किलोमीटर प्रति तास आहे, यावरून प्रवासी विमान उड्डाण करतं. जगातील सर्व आण्विक-सशस्त्र आंतरखंडीय क्षेपणास्त्रं (ICBM) हायपरसॉनिक आहेत. ती जास्तीत जास्त 24,140 किलोमीटर प्रति तास किंवा 6.4 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहेत.
पारंपारिक आणि अपारंपरिक शस्त्रांनी सुसज्ज हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विमानवाहू जहाजांसारख्या अधिक महत्त्वाच्या लक्ष्यांना लक्ष्य करण्यासाठी प्रभावी आहेत. अशी लक्ष्ये भेदण्याची क्षमता असल्यामुळे याचा युद्धाच्या परिणामांवर मोठा प्रभाव पडेल. तथापि, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे महाग आहेत आणि यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता नाही.