देशात मान्सूनने धडक दिली आहे. उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी लोकांना पावसात फिरायला आवडते, परंतु काहीवेळा निष्काळजीपणामुळे स्मार्टफोन पावसात भिजतो आणि तो खराब होतो. यामुळेच स्मार्टफोनला पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी 5 ट्रिक आपण पाहणार आहोत.
स्मार्टफोनला पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही वॉटरप्रूफ फोन केस विकत घ्या. ही ऍक्सेसरी पाणी आणि आर्द्रता या दोन्हीपासून डिव्हाइसचे संरक्षण करते. तुम्ही रिटेल मार्केट आणि ऑनलाइन ई-कॉमर्स साइटवरून वॉटर प्रूफ केस खरेदी करू शकता.
तुम्हाला पावसात प्रवास करायचा असेल तर तुम्ही तुमचा स्मार्टफोन सीलपॅक बॅगमध्ये ठेवावा. यामुळे, तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे सुरक्षित राहतो आणि पावसाच्या पाण्यामुळे खराब होण्यापासून वाचतो.
पावसाळ्यात तुमचा स्मार्टफोन खराब होण्यापासून वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पावसात बाहेर जाताना फोन वापरणे टाळणे. दुसरीकडे, कॉल किंवा मॅसेजला रिप्लाय देणे आवश्यक असल्यास, फोन वापरण्यापूर्वी अशी जागा निवडा. जिथे वरून पाणी पडत नाही.
पावसात तुमचा स्मार्टफोन भिजला तर घाबरू नका. स्मार्टफोन मऊ कापड किंवा टिश्यू पेपरने त्वरीत पुसुन घ्या. तुमच्या फोनमधून पाणी काढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तांदूळ भरलेल्या कंटेनरमध्ये फोन ठेवा.
स्मार्टफोन खरेदी करताना, त्याचे IP रेटिंग चेक करा. आयपी रेटिंग पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी दिले जाते. अशा वेळी तुम्ही फक्त आयपी 67 किंवा IP68 रेटिंग केलेले स्मार्टफोन खरेदी करावेत. हे रेटिंग स्मार्टफोनचा वॉटर रेझिस्टन्स दाखवते. म्हणजेच मर्यादित खोलीपर्यंत पाण्यात बुडवूनही स्मार्टफोन खराब होणार नाही