Ather 450X : Ather, एनर्जी स्टार्टअप अंतर्गत स्कूटर निर्माता कंपनी आहे. सध्या या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर दक्षिण भारतातील बेंगळुरु आणि चेन्नई शहरात उपलब्ध आहेत. आता लवकरच कंपनी दिल्लीसह उत्तर भारतातील बड्या शहरात आपली डीलरशीप देणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला एकदा चार्ज केल्यानंतर 107 किमीपर्यंत चालवता येऊ शकते. याची किंमत 1 लाख रुपये आहे.
Hero Optima : हीरो इलेक्ट्रिक Optima स्कूटर भारतीय बाजारात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात तीन रंगात उपलब्ध केली आहे. फुल चार्ज करण्यासाठी 8 ते 10 तासांचा वेळ लागतो. एकदा चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 50 किमीपर्यंतचं अंतर पार करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 41770 रुपयांत खरेदी करता येऊ शकते.