आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात फोन दिसतो. फोन चालवण्यासाठी बॅटरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशा वेळी त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पण, बहुतांश लोकांना अनेक गोष्टींची माहिती नसते.
फोनची बॅटरी किती टक्के चार्ज करावी लागते. हे एक सोपी माहिती आहे. परंतु अज्ञानामुळे लोक अनेकदा चुका करतात. फोन चार्जिंगमध्ये असताना तो 100 टक्के चार्ज व्हावा, अशी बहुतेकांची इच्छा असते. म्हणून लोक पुन्हा पुन्हा फोन चार्जिंगला लावतात. तर काही लोक हे 15 टक्क्यांपेक्षा कमी बॅटरी झाल्यावर फोन चार्जिंगला लावतात. पण हे चुकीचं आहे.
एक्सपर्ट्सच्या मते, पहिल्याच्या अॅसिड बॅटरीप्रमाणे पुढील चार्जिंगपूर्वी फोनची बॅटरी पूर्णपणे संपण्याची वाट पाहू नये. असं केल्याने मॉर्डन काळातील लिथियम आयन बॅटरीचे नुकसान होऊ शकते.
तर फोन किती टक्के चार्ज करावा? तज्ज्ञांच्या मते, फोनची बॅटरी चांगली ठेवण्यासाठी, बेस्ट म्हणजे फोनची चार्जिंग 20 टक्क्यांपर्यंत गेल्यावर फोन चार्जिंगवर ठेवावा आणि तो 80-90 टक्क्यांपर्यंतच चार्ज केला जावा.
तुम्ही फास्ट चार्जिंग वापरत असाल तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण, 0% पासून चार्ज केल्याने भरपूर उष्णता निर्माण होईल. तसंच 80% च्या वर फास्ट चार्जिंगची एफिशिएंसी कमी होईल.