आजकाल बहुतेक लोक दोन सिम वापरतात. यातील एक कुटुंबासाठी आणि दुसरा बिझनेससाठी आहे. अनेकदा यापेक्षा जास्त सिम वापरतात किंवा दुसरे सिम फक्त इमर्जन्सी म्हणून ठेवतात. जे लोक दुसरे सिम फक्त इमर्जन्सी वेळेसाठी ठेवतात. ते बरेच वेळा त्या सिमला रिचार्ज करायला विसरतात.
नियमानुसार बंद झालेला नंबर दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केला जातो. परंतु, प्रत्येकालाच त्यांचा नंबर जावा असे वाटत नाही. कारण, कधी हा नंबर विशेष असतो, तर कधी अनेक महत्त्वाच्या सेवा त्याच्याशी जोडलेल्या असतात.
अशा वेळी, सिम बंद राहिल्यास आणि रिचार्ज न केल्यास कंपन्या किती दिवस एखाद्याला सिम देतात हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. याचे योग्य उत्तर जाणून घेऊया.
सिम ट्रान्सफर करण्यापूर्वी कंपन्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी करतात. सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही सिममध्ये 60 दिवस कोणतेही रिचार्ज करत नाही. तेव्हा सिमला इनअॅक्टिव्ह केलं जातं. यानंतर 6 ते 9 महिन्यांचा कालावधी दिला जातो. जेणेकरून तुम्ही नंबर रिचार्ज करून पुन्हा अॅक्टिव्ह कराल.
रिचार्ज केल्यानंतरही तुम्ही सिम वापरत नसाल तर कंपनी अनेक वार्निंग देते. तरीही तुम्ही सहमत नसल्यास, शेवटी कंपनी सिम एक्सपायर करण्याची प्रक्रिया सुरू करते.
त्यानंतर काही महिन्यांतच हा सिम क्रमांक दुसऱ्या युजरला ट्रान्सफर केला जातो. या प्रक्रियेस एक वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सिम ट्रान्सफर करण्यासाठी संपूर्ण वर्षाचा कालावधी लागतो.