गुरूच्या दोन भिन्न चित्रांमध्ये वेगवेगळ्या वेवलेंथ मेजरमेंट दिसत आहेत. हे गुरू ग्रहावरील विविध वातावरणीय परिस्थिती दर्शवते.
या दुर्बिणीतून घेतलेल्या फोटोंमध्ये गुरूचे तीन चंद्र म्हणजेच उपग्रहही दिसत आहेत. युरोपा, थेबे आणि मॅटिस अशी त्यांची नावे आहेत.
गुरूचे एकूण 79 उपग्रह आहेत. त्याचे ग्रेट रेड स्पॉट हे उच्च दाबाचे क्षेत्र असून ज्याला नासा महाकाय वादळ, असे संबोधतो.
हे फोटो नासाच्या कमिशनिंग डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यावरून समजते की दुर्बिणीचा NIR लक्ष्याचा मागोवा घेऊ शकतो.
नासाचे म्हणणे आहे की सर्वात शक्तिशाली दुर्बिणी JWST चा वापर पृथ्वी, अवकाशातील वस्तू आणि धूमकेतूंचा मागोवा घेण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
गुरू हा रहस्यांनी भरलेला ग्रह आहे. वास्तविक हा वायूचा गोळा आहे, त्याचा पृष्ठभाग कठीण नाही. त्याच्या पृष्ठभागावरील आवरण नेहमीच आश्चर्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. या ग्रहाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे आजपर्यंत सापडलेली नाहीत. आता या दुर्बिणीच्या मदतीने या ग्रहाविषयीची अनेक कोडी सुटतील, अशी अपेक्षा आहे.