रिलायन्स जिओ फक्त 4G आणि 5G नेटवर्क चालवते. एचडी व्हॉईस कॉलिंग, एफएम रेडिओ, उत्कृष्ट कॅमेरा, जिओ भारत व्ही2 फोन यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या रिलायन्स जिओला मोठ्या संख्येने 2G यूझर्सशी कनेक्ट होण्यास मदत होईल. या फोनची किंमत फक्त 999 रुपये आहे.
Jio Bharat V2 फोनच्या फिचर्सविषयी बोलायचं झालं तर, यूझर्सला अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स मिळतील. ते भारतात कुठेही आणि कधीही कॉल करू शकतील. रिलायन्स जिओच्या उत्तम नेटवर्कवरून एचडी व्हॉईस कॉलिंगचा अनुभवही खास असेल.
आज भारतात UPI पेमेंट ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. Jio Bharat V2 देखील या कामात खूप मदत करेल. रिलायन्स जिओच्या वेगवान 4G नेटवर्कमुळे ऑनलाइन पेमेंट झटपट होईल.
Jio Bharat V2 ग्राहकांना Jio Cinema आणि Jio Saavn च्या मोफत सेवा मिळतील. म्हणजे मनोरंजनाच्या आघाडीवर या फोनशी इतर कोणताही स्वस्त फोन स्पर्धा करू शकणार नाही.
Jio Bharat V2 चे मंथली आणि वार्षिक प्लॅन सर्वात स्वस्त असतील. यूझर्सला 123 रुपयांमध्ये 28 दिवस अनलिमिटेड कॉल आणि 14 जीबी डेटा मिळेल. सध्या बाजारात केवळ 2 GB डेटा 179 रुपयांमध्ये 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे.