UPI Payment करताना इंटरनेट नसल्यास, नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ची *99# ही सुविधा फायद्याची ठरेल.
2/ 7
*99# NPCI ची USSD वर आधारित मोबाईल बँकिंग सर्विस आहे.
3/ 7
ही सर्विस नोव्हेंबर 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती. सुरुवातीला ही सर्विस केवळ BSNL आणि MTNL युजर्ससाठीच उपलब्ध होती.
4/ 7
महत्त्वाची बाब म्हणजे *99# द्वारे UPI Payment करताना तुमचा फोन नंबर बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्याच फोन नंबरला BHIM APP रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे.
5/ 7
सर्वात आधी फोनचा डायल पॅड ओपन करा आणि *99# टाइप करुन कॉलवर टॅप करा. इथे एक नवी विंडो दिसेल, ज्यात 7 ऑप्शन्स असतील. Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN असे ऑप्शन्स असतील.
6/ 7
केवळ पैसे पाठवायचे असल्यास, डायल पॅडवर 1 नंबर दाबून Send Money पर्याय निवडा. त्यानंतर फोन नंबर, UPI ID किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोडचा वापर करुन पैसे पाठवा.
7/ 7
त्यानंतर अमाउंट लिहून ट्रान्झेक्शन पूर्ण करण्यासाठी 4 ते 6 अंकी UPI PIN एंटर करा. त्यानंतर Send वर टॅप करा.