ज्यावेळी मेन डिव्हाईस चेंज कराल किंवा एखाद्या नव्या डिव्हाईसवर तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट सेट करायचं असेल, त्यावेळी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. हा OTP नव्या डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअॅप अकाउंट सेट करण्यासाठी वापरावा लागेल. महत्त्वाची बाब हा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका. कोणी एखादा तुमच्या अकाउंटमध्ये लॉगइन करण्याचा प्रयत्न करत असल्यासही ओटीपी येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या फोनवर आलेला ओटीपी कोणाशीही शेअर करू नका.