खरं तर आपण Halonix B22D 9-Watt LED ब्लूटूथ स्पीकर म्युझिक बल्बबद्दल बोलत आहोत. नाव वाचून अंदाज आलाच असेल की, हा बल्ब काय आहे.
सर्वप्रथम, हा 9W बल्ब कॉमन बल्बसारखा पांढरा प्रकाश देतो. नंतर एका विशिष्ट पद्धतीने चालू केल्यावर तो नाइट लाइटमध्ये पिवळा प्रकाश देतो. म्हणजेच तो 0.5W चा नाईट बल्ब बनतो.
यासोबतच यामध्ये कमी व्हॅटचा एक ब्लूटूथ स्पीकरही देण्यात आलाय. म्हणजेच या बल्बला फोन जोडून तुम्ही गाणी ऐकू शकता. हा स्पीकर नाइट लाइटचंही काम करतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते चार्ज करण्यात कोणतीही अडचण नाही. यात बॅटरीही नाही. चांगली गोष्ट म्हणजे हा एलईडी बल्ब आहे आणि एलईडी बल्ब कमी वीज वापरतात.
हा बल्ब ग्राहकांना आता Amazon वरून फक्त Rs.499 मध्ये खरेदी करता येणार आहे. या बल्बचा बेस B22D असून त्याचा आकार गोल आहे. त्याचा ब्राइटनेस 900 लुमेनचा आहे. हे इनडोर किंवा आउटडोर कुठेही वापरता येऊ शकते.