टीम इंडिया लागोपाठ दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. यावेळी टीम इंडियाची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. मागच्यावेळसारखी यंदा संधी हुकणार नाही, याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. (Ravichandran Ashwin/Instagram)
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली ही फायनल इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हलमध्ये 7 ते 11 जूनपर्यंत होणार आहे. मागच्या वेळी फायनलमध्ये टीम इंडिया उतरली होती तेव्हा टीम इंडियाचं नेतृत्व विराट कोहली करत होता, तर यावेळी रोहित शर्मा कर्णधार आहे.
काहीच दिवसांपूर्वी संपलेली आयपीएल फायनल पावसामुळे प्रभावित झाली. सीएसके आणि गुजरात यांच्यातला सामना पावसामुळे राखीव दिवशी झाला. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही पावसाचं सावट आहे.
7-11 जून या काळात मॅचचा निकाल लागला नाही आणि पाऊस पडला तर 12 जूनचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. -BCCI
राखीव दिवसानंतरही जर पावसाचा जोर कायम राहिला तर ट्रॉफी कोणत्या टीमला देण्यात येणार? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आयसीसीच्या नियमानुसार जर निकाल लागला नाही तर भारत-ऑस्ट्रेलिया यांना संयुक्तरित्या विजयी घोषित केलं जाईल.- BCCI